Srinivas Vanaga, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Srinivas Vanaga : 'साहेबांनी डावललं तर जगून काय फायदा...'; श्रीनिवास वनगा 'नॉट रिचेबल' होण्याआधी काय म्हणाले? पत्नीने सांगितलं

Palghar Assembly Constituency Election 2024 : महायुतीत श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी डावलून भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावीत यांना पालघरमधून उमेदवारी दिल्यामुळे वनगा प्रचंड नाराज झाले आहेत. काल माध्यमांशी प्रतिक्रिया देताना ते ढसाढसा रडले होते.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election: एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) हे नॉट रिचेबल आहेत.

महायुतीत श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी डावलून भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावीत यांना पालघरमधून उमेदवारी दिल्यामुळे वनगा प्रचंड नाराज झाले आहेत. सोमवारी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना ते ढसाढसा रडले होते.

शिवाय आपण शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून मोठी चूक केली. उद्धव ठाकरे देव माणूस आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. वनगा यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात होता. मात्र, अशातच ते रात्री अचानक घराबाहेर पडले ते अद्याप परतले नाहीत.

त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी लागून राहिली आहे. सध्या त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अशातच आता त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, 'ते जीवन संपवण्याची भाषा करत होते' असं सांगितलं आहे. सुमन वनगा म्हणाल्या, एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी त्यांना सांगितलं होतं की, ते तिकीट देणार आहेत.

पण त्यांनी केलेल्या कसल्यातरी सर्व्हेते ते निवडून येऊ शकतं नाही असं सांगितलं गेलं. दरम्यान, त्यांना विधान परिषदेवर पहिल्या यादीतच घेणार असल्याचंही ते म्हणले होते. त्यामुळे त्यांनी आता दिलेला शब्द पाळावा."

जगून काय फायदा

तसंच ते सतत माझा जगून काही फायदा नाही असं म्हणत असल्यचंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "ते कालपासून टेन्शमध्ये होते. म्हणत होते की, 'साहेबांनी डावललं तर माझा जगून काय फायदा, मी एवढा बेक्कार आहे. मी इतका वाईट आहे का? मी जीवाचं बरं वाईट करून घेणार.' शिवाय ते कुठे गेले ते त्यांच्या ड्रायव्हरला आणि मित्रांना देखील माहिती नाही. ते अंधारात गाडी न घेता गेले आहेत. त्यामुळे ते कुठे गेले हे देखील माहिती नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT