Bharti Kamadi-rajendra gavit-Hemant Savra - rajesh patil Sarkarnama
मुंबई

Dr. Hemant Savra News : पालघरमध्ये सवरांना ऊमेदवारी दिल्याने निवडणुक होणार अटीतटीची !

भगवान खैरनार

Mokhada News : भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करत भाजपने यंदाच्या वर्षी डॉ. विष्णू सवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पालघर लोकसभेच्या निवडणूक रंगतदार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पालघर मध्ये धक्कातंत्र वापरत भाजपने खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारली. परिणामी ही लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

पालघर (Palghar) लोकसभा मतदारसंघातून भाजप नक्की कोणाला उमेदवारी देणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार उत्सुकता होती. ऊमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पालघर मध्ये महायुतीचा ऊमेदवार नक्की कोण? हा सस्पेंस होता.

त्याचवेळी भाजपने गुगली टाकत, निष्ठावान कार्यकर्ता डॉ.हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली. सवरा हे दिवंगत भाजप नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र आहेत. त्यामुळे पालघर ची निवडणुक अटीतटीची होणार हे निश्चित झाले आहे. पालघरमध्ये आता महायुती,महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या शिंदे गटाने पालघरच्या जागेवर आपला दावा सांगितला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील गेल्या महिन्यात पालघर मध्ये येऊन विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी देखील जाहीर केली होती.

त्यानंतर गावित यांनी प्रचार देखील सुरू केला होता. त्याचवेळी भाजप पदाधिकार्यांनी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याचवेळी राजेंद्र गावीत यांनी निशानी कोणत्याही पक्षाची मिळाली तरी ऊमेदवार आपणच असणार असे ठासून सांगितले होते. 

पालघर मधील भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला जोरदार विरोध करत प्रसंगी राजीनाम्यांचा इशारा देत बंडाचा झेंडा उभारला होता. याची दखल भाजपच्या (BJP) वरिष्ठांना घ्यावी लागली आहे. गेले महिनाभर हे नाराजीनाट्य सुरूच होते.

दुसरीकडे महाविकास आघाडी ने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांना ऊमेदवारी देऊन प्रचाराला सुरूवात देखील केली.उद्धव ठाकरे यांनी पालघर मध्ये सभा घेऊन रणशिंग फुंकले. त्यापाठोपाठ जिल्ह्यात राजकीय ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडी ने बोईसर चे आमदार राजेश पाटील यांना ऊमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप ने आपला हुकुमाचा पत्ता बाहेर काढला. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता डॉ. सवरा यांना उमेदवारी दिली आहे. पालघर च्या आदिवासी ग्रामीण, शहरी व सागरी भागात हेमंत सवरा यांचे मोठे काम आहे.

तसेच सवरा कुटुंब संघ परिवाराशी संबधित आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उमेदवारीमुळे पालघर मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT