Raosaheb Danve News : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना; नाराज खोतकर दानवेंच्या प्रचारात सक्रिय होणार?

Arjun Khotkar News : रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली आहे. पण, खोतकर यांची नाराजी दूर झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Raoasaheb Danve | Arjun Khotkar
Raoasaheb Danve | Arjun KhotkarSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 3 May : केंद्रीय मंत्री, जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना ( शिंदे गट) उपनेते अर्जुन खोतकर यांच्यात ऐन लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) वैचारिक मतभेत दिसत होते.

याची प्रचिती रविवारी जालन्यात झालेल्या एका कार्यक्रमात आली होती. एकाच कार्यक्रमात हजर असताना दोन्ही नेत्यांमध्ये अबोला राहिल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली होती. यातच गुरूवारी (2 मे) रात्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे.

2019 ची जालना लोकसभा निवडणूक वादळी ठरली, ती रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिलेल्या आव्हानामुळे. या निवडणुकीत खोतकर यांची समजून काढताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आलं होतं.

अखेर वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यावर खोतकर यांनी माघार घेतली होती. नंतर 2019 च्या निवडणुकीत खोतकर यांचा पराभव झाला. त्यातून खोतकर आणि दानवे यांच्यातील मतभेद आणखी वाढले. याची प्रचिती वेळोवेळी दिसूनही आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मित्रपक्षाचा मेळावा झाला आणि दानवे यांना पाच लाखांची लीड देण्याची घोषणा महायुतीतील नेत्यांनी केली.

तेव्हा खोतकर यांनीही युती धर्म पाळत दानवे यांना लीड देऊ, असा दावा केला होता. त्यानुसार काही कार्यक्रमांना खोतकर यांनी हजरेही सुद्धा लावली होती. पण, नंतरच्या कार्यक्रमांपासून खोतकर यांनी दूर राहणं पसंत केलं. भाजपकडून मान-सन्मान मिळत नसल्यानं शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यासह खोतकर यांनीही योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं होतं. त्यात दानवे यांचा भरण्याच्या आणि प्रचाराचा नाराळ फोडण्याच्या कार्यक्रमाला खोतकर यांनी दानवे यांनी दांडी मारली होती. त्यामुळे खोतकर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Raoasaheb Danve | Arjun Khotkar
Jalna Loksabha Constituency : परदेशात शिकणारा नातू रावसाहेब दानवेंच्या प्रचारात उतरला..

त्यात खोतकर आणि दानवे हे रविवारी जालना येथी एका कार्यक्रमात हजर होते. पण, त्यांनी एकमेकांशी अबोला ठेवल्यानं महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली होती. यातच गुरूवारी (2 मे) रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या 'दर्शना' निवासस्थानी जात भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे खोतकर आता दानवे यांच्या प्रचारात सक्रिय होतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Raoasaheb Danve | Arjun Khotkar
Jalna Lok Sabha: विकासावर बोला! दानवेंचं आव्हान काळेंनी स्वीकारलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com