Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना नितेश राणेंनी डिवचलं; म्हणाले, त्यांच्या सभेमुळे माझे मताधिक्य वाढते...

Amit Kadam News : अमित शहा यांच्या सभेवर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, ही सभा कोकणच्या विकासासाठी आहे. गेल्या हा दहा वर्षात मोदींनी विकास कसा केला, पुढची येणारी वर्षे मोदी साहेब काय करणार आहेत, हे ते सांगणार आहेत
Uddhav Thackeray, Nitesh Rane
Uddhav Thackeray, Nitesh RaneSarkarnama

Nitesh Rane News : उद्धव ठाकरे यांची ज्या ज्यावेळी कणकवलीत सभा झाली त्यावेळी त्यांनी राणे कुटुंबिय, फडणवीस आणि भाजपला शिव्या शाप देण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. ज्या ज्यावेळी त्यांची कणकवलीत सभा झाली त्या त्या वेळी माझे मतदान वाढले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी लवकर यावे, त्यांच्या स्टाईलने सभा घ्यावी आणि माझं मताधिक्य वाढवावे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या सभा कणकवली मतदारसंघात होणार आहेत. यावरुन आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. अमित शहा यांच्या सभेवर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, ही सभा कोकणच्या विकासासाठी आहे. गेल्या हा दहा वर्षात मोदींनी विकास कसा केला, पुढची येणारी वर्षे मोदी साहेब काय करणार आहेत, हे ते सांगणार आहेत.

लोकांना तिकडे आल्यानंतर काहीतरी चांगले विचार, प्रबोधन करणारे विचार ऐकायला मिळतील. जेणेकरून मोदी सरकारला मतदान केल्यानंतर आमच्या आयुष्यात काय परिवर्तन आहे, हे सांगण्यासाठी अमित शहा येतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हे आमच्या कणकवलीत येत आहेत. ते शिव्या शापाच्या पलीकडे काहीच करणार नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Nitesh Rane
Kokan Politics : तब्बल दहा वर्षांनंतर केसरकरांच्या उंबऱ्याला लागले राणेंचे पाय; एकेकाळच्या विरोधकांचा एकत्रित प्रचार...

कारण उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा कणकवलीत, कोकणात आलेत, तेव्हा राणे कुटुंबाला शिव्या देणं, फडणवीसंना काहीतरी बोलणं, आणि भाजपाला शिव्या देण्यापलिकडे काहीच बोलले नाहीत. त्यामुळे मला एक चांगला अनुभव आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी कणकवलीत सभा घेतलेली आहे, तेव्हा माझं मतदान वाढलेल आहे. त्यामुळे उद्धवजींनी इथे लवकर यावं आणि त्यांच्या स्टाईलमध्ये सभा घ्यावी आणि माझं मताधिक्य वाढवावं, असे आव्हान त्यांनी केले आहे.

बाळासाहेबांचे गुण राज ठाकरेंनी घेतलेत...

राज ठाकरेंची सभा कोकणात होत आहे, यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, त्यांच्याशी राजकारणाच्या पलिकडचे संबंध आहेत. राज ठाकरे नावाप्रमाणे राजा माणूस आहे. बाळासाहेबांचे सगळे गुण हे राज ठाकरे यांनी घेतलेले आहे.

त्यांच्या मधला महत्त्वाचा गुण म्हणजे राजकारणी आणि वैयक्तिक संबंधांमध्ये ते कधीही गल्लत करत नाहीत. राणेसाहेब आणि राजसाहेब यांचे संबंध आणि राजकीय प्रवास पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आमच्या हक्काचा ठाकरे उद्या येत आहेत, असेही ते म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

Uddhav Thackeray, Nitesh Rane
Kokan Politics: कोकणात नवा ट्विस्ट; किरण सामंतांची माघार; महायुतीकडून नारायण राणेंचे नाव फायनल?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com