Hemant savara Hemant savara
मुंबई

Palghar Loksabha : पालघरमध्ये अखेर ठरलं, भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

Loksabha Election : पालघरची जागा शिवसेनेकडे होती. विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, भाजपने शिवसेनेकडून ही जागा खेचून आणत

Roshan More

Loksabha Election : पालघर लोकसभा मतदारसंघात उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वीच पालघर मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही जागा शिवसेनेकडे होते. विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, भाजपने शिवसेनेकडून ही जागा खेचून आणत हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली. हेमंत सावरा हे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा ShivSena (शिंदे गट) की भाजपचा यावरून चर्चा सुरू होती. मतदरसंघ कोणाला मिळाला तरी तिकीट मात्र राजेंद्र गावीत यांनाच मिळणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. शिंदे गट देखील पालघरच्या जागेसाठी आग्रही होता. कारण या जागेवर त्यांचा विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हे होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदेंसोबत Eknath Shinde होते. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा असेल असे सांगितले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, भाजपने सर्व शक्यतांना पूर्ण विराम देत पालघर मतदारसंघ मिळवला. कल्याण, ठाणे मतदारसंघासाठी भाजप आग्रही होते मात्र या जागेवर शिंदेंनी त्यांचा दावा कायम ठेवला होता. त्यामुळे पालघरची ही जागा शिंदे गटाला मिळाली असतील तर भाजप कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असता त्यामुळे भाजप पालघरच्या जागेसाठी आग्रही होता.

तिरंगी लढत होणार

ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, बहुजन विकास आघाडीने राजेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून हेमंत सावरा मैदानात असणार आहे. जर राजेंद्र पाटलांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर ही निवडणूक तिरंगी होणार हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT