Pune Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदेना पुण्यातून मोठा झटका; शहराध्यक्ष नाना भानगिरे पक्ष सोडणार?

Shiv Sena Pune President Nana Bhangire News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कार्यकर्त्यांना टाळले जात असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप...
Pune Shiv Sena News
Pune Shiv Sena NewsSarkanama

Pune News : पुणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार आणि कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री शिंदेची संघटनात्मक पातळीवर डोकेदुखी वाढली आहे. (Latest Marathi News)

दोनच दिवसांपूर्वी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे शहराध्यक्ष नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते.

यासाठी मोठी जय्यत तयारी नाना भानगिरे व त्यांच्या समर्थकांनी मोहम्मदवाडी या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी नाना भानगिरे यांच्या घरी जाणं टाळलं. यामुळे पुण्यातील शिवसैनिक चांगलेच नाराज झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Shiv Sena News
Eknath Shinde News : महायुतीत एकनाथ शिंदेंचं वजन वाढलं; अजितदादांचं काय ?

यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांकडून नाना भानगिरे यांना टाळण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नाना भानगिरे समर्थक मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. पक्ष सोडण्याच्या निर्णयावरती युवा सेना, युवती सेनेच्या ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विचार सुरु आहे. आज एक बैठक घेऊन शिवसेना शिंदे गट सोडण्याच्या निर्णयावर नाना भानगिरे समर्थक चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे काल नसरापूर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी आले होते. सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख असणाऱ्या रमेश कोंडे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी गेले.यावेळीही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून डावललं गेल्याची चर्चा आहे.

Pune Shiv Sena News
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

पक्षातील काही ठराविक लोक मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना चुकीची माहिती देतात. त्यामुळे मुख्यमंत्री वारंवार अनेक पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात, असे आरोप अनेक समर्थकांनी केले आहेत. बैठकीच्या वेळी अनेक वेळा वाद झाले असल्याने मोठी नाराजी निवडणुकीत पाहायला मिळते. त्यामुळे नाना भानगिरे शिवसेना सोडण्याच्या वाटेवर असून आजच्या बैठकीत ते निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com