Pankaja Munde and Sadabhua Khot at vidhan bhavan Sarkarnama
मुंबई

Pankaja Munde : इतनी खुशी...! पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत समोरासमोर येतात तेव्हा...

Jagdish Patil

Mumbai Vidhan Bhavan : भाजपने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे आणि शेतकरी स्वाभिमान संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवारांना समावेश आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळाल्यामुळे त्यांचं लोकसभेचे दुःखं काही प्रमाणात कमी झाल्याचे बोललं जात आहे.

अशातच मंगळवारी पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधान परिषदेत आल्या होत्या. विधान परिषदेत जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या माध्यमांशी बोलत असताना त्यांच्या पाठीमागे येऊन सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे भाजप नेते उभे राहिले होते.

माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) मागे पाहिलं असता त्यांना सदाभाऊ खोत दिसले यावेळी त्या चांगल्याच आश्चर्यचकित झाल्या. यावेळी मुंडें यांनी सदभाऊ यांचं मोठ्या आनंदाने त्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छाही दिल्या. सदाभाऊंनी देखील पंकजा यांचे अभिनंदन केले. एकमेकांना नमस्कार करून शुभेच्छा देताना त्यांचे चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते.

पंकजा मुंडे यांचा अनेक दिवसापासूनचा राजकीय वनवास संपल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून भाजपकडून त्यांना कोणतीही संधी देण्यात आली नव्हती. शिवाय महायुतीकडून त्यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र इथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या पराभवामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवाय राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठावाद पाहता ओबीसी (OBC) समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजप त्यांना उमेदवारी देईल असही म्हटलं जात होतं. दरम्यान काल भाजपने त्यांच्यासह सदाभाऊ खोत आणि इतर तीन जणांची नावे विधान परिषदेसाठी जाहीर केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT