Video Kishor Darade Win : नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे विजयी, ठाकरे गटाला चारली धूळ; विवेक कोल्हेंना किती मते?

Nashik Teachers Constituency Result : अतिशय चुरशीच्या आणि गैरप्रकारांमुळे वादग्रस्त ठरलेली नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा शिंदे गटाने राखली आहे.
sandip gulve kishor darade vivek kolhe
Sandip gulve kishor darade vivek kolheSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला. बहुचर्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

आमदार दराडे यांना 26 हजार 476 मते मिळाली. अपक्ष विवेक कोल्हे ( vivek Kolhe ) यांना 17 हजार 372 मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना 16 हजार 280 मते मिळाली. आमदार दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले.

या निवडणुकीत आमदार किशोर दराडे ( Kishor Darade ) विरुद्ध विवेक कोल्हे अशी लढत होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतदानातूनही तेच दिसून आले. मात्र, मराठा विद्या प्रसारक संस्थेचा सक्रिय पाठिंबा असलेल्या संदीप गुळवे यांची फजिती झाली. ऐनवेळी पक्षांतर करूनही त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

sandip gulve kishor darade vivek kolhe
Devyani Pharande News : आमदार फरांदेंचा अजब दावा; म्हणतात, 'तो तर जुगाराचा अड्डा '

या निवडणुकीत आमदार किशोर दराडे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. यापूर्वी ते शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार होते. यंदा ते शिवसेना ( Shivsena ) शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. या निवडणुकीत त्यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप विरोधकांनी केले होते.

sandip gulve kishor darade vivek kolhe
Devyani Pharande News : आमदार फरांदेंचा अजब दावा; म्हणतात, 'तो तर जुगाराचा अड्डा '

ही निवडणूक सुरुवातीपासून विशेष चर्चेचा भाग बनली होती. यामध्ये आमदार दराडे यांच्या संस्थेतील आणि अपक्ष उमेदवार कोल्हे यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दोन उमेदवार रिंगणात होते. मात्र, ते फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत.

संदीप गुळवे यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दोन उमेदवार होते. त्यांचाही फारसा परिणाम झाला नाही. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) स्वतः मतदारसंघात संस्थाचालकांच्या बैठका घेण्यासाठी आले होते. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com