Legislative Council Election 2024 : राईट हँडला की राणेंना थेट भिडणाऱ्याला उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर देणार संधी?

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यात होती. पण, ठाकरेंनी उमेदवार उतरविल्यास चुरस वाढू शकते.
uddhav thackeray assembly
uddhav thackeray assemblysarkarnama
Published on
Updated on

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरदचंद्र पवार ) आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यातच शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) दोन नावे चर्चेत आली आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे राईट हँड अर्थात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नेते, नारायण राणे यांच्याकडून लोकसभेला पराभूत झालेले विनायक राऊत यांनाही विधानपरिषदेवर संधी मिळू शकते.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे राईट हँड समजले जातात. शिवसेना फुटीनंतर नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, नार्वेकर आजही ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे नार्वेकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

तर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांचा नारायण राणे यांनी पराभव केला होता. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरीत उमेदवार पराभूत झाल्यानं कोकणातून शिवसेना हद्दपार झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, 'मी कोकणातून शिवसेना संपवली,' असं विधान नारायण राणेंनी केलं होतं. त्यामुळे कोकणात शिवसेनेला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी आणि राणेंना थेट भिडणाऱ्या विनायक राऊतांना विधानपरिषदेवर घेत त्यांचं पुर्नवसन केल जाऊ शकते. ठाकरेंकडून नार्वेकर की राऊत कोणाला संधी मिळते, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

uddhav thackeray assembly
Uddhav Thackeray : लोकसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही ठाकरेंचा करिष्मा कायम; मुंबईतील दोन्हीही जागा जिंकल्या...

भाजपनं पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचे अतिरिक्त मते आणि शिवसेनेतील मतांच्या आधारे ठाकरेंचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण, राष्ट्रवादीनं शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचा एक आणि शेकापचे जयंत पाटील रिंगणात राहिल्यास चुरस वाढण्याची शकते.

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता आहे. 103 आमदार असलेल्या भाजपचे अपक्षांच्या मदतीनं पाचही उमेदवार निवडून येऊ शकतात. 50 आमदार असलेल्या शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतील. 42 आमदार असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीचा 9 जागा जिंकण्याचा मानस आहे.

uddhav thackeray assembly
Anil Parab : मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या...; विजयानंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीतील काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादीनं ( शरदचंद्र पवार ) शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडील मतांच्या आधारे एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण, ठाकरेंनी एक उमेदवार रिंगणात उतरविल्यास समीकरणं बदलू शकतात. महायुती 9 आणि महाविकास आघाडीनं 2 जागा वाटून घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. पण, ठाकरेंचा एक आणि जयंत पाटील रिंगणात उतरल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com