Pankaja Munde Politics News : 'अत्यंत वंचित, पीडीतांचा, शोषितांचा आवाज बनण्यासाठी आणि निर्भिडपणे त्यांच्यासाठी भूमिका घेण्यासाठी राजकारणात मुंडे साहेबांनी मला आणलेलं आहे. आज मला माझ्या पित्याची खूप आवर्जून आठवण येत आहे आणि आज त्या सर्व घटकांची, नेत्यांची आठवण येते, ज्यांनी मला ही शक्ती दिली. ही निर्भिडता दिली. राजकारणात संघर्ष करत असताना सगळ्यांना घेवून काम करण्याची शक्ती दिली.' अशा भावना पंकजा मुंडे यांनी विधानपरिषद आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर व्यक्त केल्या आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी विधान परिषद आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर, आता त्या बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. उद्या बीडच्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर नतमस्तक होऊन, मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.'
उद्या(सोमवार) सकाळी 10 वाजता, त्या संत भगवानबाबांची जन्मभूमी श्रीक्षेत्र भगवान भक्तीगड, सावरगाव घाट दाखल होणार आहेत. त्यानंतर श्रीक्षेत्र नारायणगड येथे दर्शन घेऊन, पुढे त्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बीड येथे वंदन करणार आहेत. त्यानंतर गोपीनाथ गड दर्शन व त्यानंतर परळी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे वंदन करणार आहेत. दरम्यान या दौऱ्यात पंकजा मुंडे या कुठलेही स्वागत स्वीकारणार नाहीत. तसेच कुठल्याही प्रकारचे हारतुरे, फुले, पुष्पगुच्छ स्वीकारणार नाहीत, अशी माहिती मुंडेंच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
शपथविधीनंतर मीडियाला प्रतिक्रिया देताना, पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाबाबत विचारलं गेलं असता त्या म्हणाल्या, 'माझ्या मंत्रिपदाबाबत मला सध्या तरी काही माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात आमक्या नेत्याचा समावेश होणार, अशी चर्चा होतच असते. तशी माझीही चर्चा आहे. त्यामुळे जे जे निर्णय होतील, ते पाहू. आता तर मला त्याबाबत काहीही माहिती नाही.
याशिवाय, 'अनेक मुद्दे असतील जे वंचितांचे आहेत, ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. माझ्या कुटुंबियांनी या संघर्षात मला साथ दिली आहे. त्याहूनही अधिक सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. त्यांचं निस्वार्थ प्रेम मला कधीही जनतेच्याच हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडेल.' असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.