Pankaja Munde : आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे मंत्रिपदाबाबत म्हणाल्या, ‘तशी माझ्या नावाची चर्चा आहे...’

MLC Oath Ceremoney : महाराष्ट्रातील चित्र खूप बदलेले आहे. ते चित्र दुरुस्त करण्याची जबाबदारी सर्व नेतेमंडळींवर आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा न राहता एकमेकांसोबत उभे राहिले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.
Parinay Fuke-Pankaja Munde
Parinay Fuke-Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 28 July : माझ्या मंत्रिपदाबाबत मला सध्या तरी काही माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात आमक्या नेत्याचा समावेश होणार, अशी चर्चा होतच असते. तशी माझीही चर्चा आहे. त्यामुळे जे जे निर्णय होतील, ते पाहू.

आता तर मला त्याबाबत काहीही माहिती नाही, असे पंकजा मुंडे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे ह्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, हा बॅच मी माझी बहीण माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून लावून घेतला आहे. माझ्या संघर्षात माझ्या दोन्ही बहिणी, आई आणि मुलांनी साथ दिली. त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांची साथही मला जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडेल. मला या वेळी माझे वडिल, ज्येष्ठ नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांची आठवण येत आहे.

महायुतीत येण्यापूर्वी दहा बैठका पार पडल्या होत्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याविषयी मला काहीही माहिती नाही. पण महायुती अतिशय एकजुटीने आणि ताकदीने विधानसभेची निवडणूक लढणार आहे. किती जागांवर लढायचं, याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीत होईल, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Parinay Fuke-Pankaja Munde
MLC Oath Ceremony : भावना गवळींचे जय एकनाथ..., तर सदाभाऊंचे जय जवान जय किसान...; अकरा जणांना आमदारकीची शपथ

महाराष्ट्रातील चित्र खूप बदलेले आहे. ते चित्र दुरुस्त करण्याची जबाबदारी सर्व नेतेमंडळींवर आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा न राहता एकमेकांसोबत उभे राहिले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. जरांगे पाटील यांच्या भाजपचे आमदार पाडा या धोरणामुळे भाजपचे डॅमेज होत आहे? त्यावर पंकजा मुंडे यांनी सध्या तेच दिसून येते, असे स्पष्ट केले.

परिणय फुके म्हणतात देशमुखांना पुन्हा जेलमध्ये टाका

आमदार परिणय फुके म्हणाले, विधान परिषद सदस्य म्हणून मी दुसऱ्यांदा शपथ घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. आधी माझ्याकडे दोन जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व होतं. जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पाडेन.

Parinay Fuke-Pankaja Munde
Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर शपथ घेऊन निघाले, सत्कार घेणे का विसरले?

'जरांगे पाटील यांच्या मागण्या असंविधानिक'

जरांगे पाटील यांच्या मागण्या असंविधानिक आहेत. जरांगे पाटील महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावण्याचे काम करत आहेत. दरम्यान, अनिल देशमुख हे वैद्यकीय रजेवर जामिनावर आहेत. देशमुख यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावं, असेही फुके यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com