Pankaja Munde : आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये येणार; समर्थकांना केलं आवाहन, म्हणाल्या...

Beed District : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्ती गडावर त्या सर्वप्रथम माथा टेकतील.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : विधान परिषदेवर आमदार म्हणून विजय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा वाढदिवसही नुकताच झाला. या दोन्ही योगानंतर समर्थकांना त्यांच्या भेटीची ओढ लागली आहे. या समर्थकांच्या भेटीसाठी पंकजा मुंडे सोमावरी जिल्ह्यात येत आहेत. मात्र, या दौऱ्यात त्या कुठलाही हार, बुके स्वीकारणार नाहीत, असे जाहीर केले आहे.

पंकजा मुंडे Pankaja Munde सोमवारी (ता. 29) बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्ती गडावर त्या सर्वप्रथम माथा टेकतील. त्यानंतर त्या श्री क्षेत्र नारायण गडावर नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा बीडला त्या येणार आहेत.

बीडमध्ये Beed पंकजा मुंडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर त्या परळीकडे रवाना होणार आहेत. परळीमध्ये त्या गोपीनाथ गडावर जाऊन आपले वडील दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर परळीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्या अभिवादन करणार आहेत.

दरम्यान, 2019 मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विविध संसदीय पदापासून टाळण्यात आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा थोड्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर काहीच दिवसांनी विधानपरिषद निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली. विधानपरिषदेवर निवडून आलेले समर्थकांमध्ये मोठा उत्साह आहे.

Pankaja Munde
Kolhapur flood Situation : कोल्हापूरात पूर परिस्थितीत अन् विधानसभेच्या इच्छुक मदतकार्यासाठी चढाओढ!

निवडणुकीतील तांत्रिक प्रक्रिया व त्यांच्या पक्ष संदर्भातील बैठकामुळे त्यांना जिल्ह्यात येता आले नव्हते. नुकताच त्यांचा वाढदिवसही झाला. परंतु समर्थकांनी केलेल्या आत्महत्यामुळे आपण वाढदिवस साजरा करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे समर्थकांना त्यांना शुभेच्छा देण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची ओढ लागली आहे. ही उत्सुकता सोमवारी संपणार असून त्या समर्थकांच्या भेटीला येत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde
Sharad Pawar On Chess : बुद्धिबळ गमतीने खेळतो, अन् वजीर आवडतो; शरद पवारांनी सांगितलं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com