Paranda Assembly Constituency 2024 Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve: तानाजीराव, किती प्रॉम्पटिंग करायचं! अरे, मुख्यमंत्र्यांना काही तरी बोलू द्या! VIDEO पाहा

Paranda Assembly Constituency 2024: शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंतांचा व्हिडिओ शेअर करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सावंतांची खिल्ली उडवली आहे. परंडा येथे एकनाथ शिंदे यांची सभा झाली.

Mangesh Mahale

धाराशिवमध्ये शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. परंडा येथे एकनाथ शिंदे यांची सभा झाली. मुख्यमंत्र्यांनी भाषण देत असताना सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांना योजनांची नावे सांगण्यासाठी तानाजी सावंत मध्येच 'प्रॉम्पटिंग' करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तानाजी सावंतांचा हा व्हिडिओ शेअर करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, अंबादास दानवे यांनी सावंतांची खिल्ली उडवली आहे. "किती प्रॉम्पटिंग करायचं तानाजीराव! अरे, मुख्यमंत्र्यांना काही तरी बोलू द्या! अशा शब्दात दानवेंनी सावंतांना चिमटा घेतला आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी तुमच्या कामाचा आढावा घेताना योजना बहुदा फक्त नावालाच होत्या, ज्याला सीएमच्या मंजुरीची गरज पडली नाही! असे अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.

"तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी," असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून, घराघरांमध्ये आग लावणारी आहे, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, "पूर्वी मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी मोजक्या लोकांना प्रवेश होता, आम्ही ते सर्वसामान्यांसाठी खुले केले. वर्षाचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास खुले असतात. कारण मी चीफ मिनिस्टर नाही तर काँमन मॅन म्हणून काम करतो. लोकांमध्ये जाऊन काम करणारा सीएम हवा, घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री जनतेला नको,"

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याला शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले.

"काहीजण म्हणतात पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, अरे चोरायला काय ते खेळणं आहे का? तुम्ही काय झोपा काढत होता का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना केला. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्याचे काम आम्ही केले, असे मुख्यमंत्री शिंदे ठामपणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT