Mumbai News: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत पटेल-तटकरे यांच्या झालेल्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार सुनेत्रा पवार नाराज आहे. त्यांना या भेटीबाबत तटकरे आणि पटेल यांनी माहिती दिली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी असल्याचे दिसून आले.
महायुतीत ही नाराजी योग्य नसल्याचे मत पार्थ पवार यांनी फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. याबाबत साम टिव्हीने बातमी दिली आहे.
पार्थ पवार यांनी काल रात्री उशीरा मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेले यांनी 'वर्षा' बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीची माहिती सुनेत्रा पवार यांना नव्हती. हीच नाराज घेऊन पार्थ पवार हे फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते, अशी माहिती आहे.
आगामी काळात महायुतीमध्ये समन्वय साधला जाईल, कुठलीही माहिती यापूढे सांगितले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी पार्थ पवार यांना दिले होते, असे समजते.
पार्थ पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नाराजीचं कारण असल्याची चर्चा रंगली असून, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.