कुणाल कामरा पुन्हा वादात, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनातील वक्तव्याने नेटकरी संतापले! अभिजीत दीपके यांनीही वाजवल्या टाळ्या

Sonam Wangchuk Protest News:सोनम वांगचुक यांच्या जंतर-मंतरवरील आंदोलनात कुणाल कामरा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
Sonam Wangchuk Protest Kunal Kamra  Remark News
Sonam Wangchuk Protest Kunal Kamra Remark NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भेट दिली. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या आंदोलनाचा 19 वा दिवस आहे.त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती आंदोलनस्थळी भेट देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कुणाल कामरा यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

आंदोलनस्थळी उपस्थितांना संबोधित करताना कुणाल कामरा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. "सरकार फक्त सीतेच्या पतीचे नाव घेते, पण काम मात्र नीताच्या पतीचे करते," असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानात भगवान राम आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचा संदर्भ आल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आंदोलनाशी संबंधित अभिजीत दीपके हेही उपस्थित होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते कामरांच्या वक्तव्यानंतर टाळ्या वाजवताना दिसत असल्याने त्यांच्यावरही सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करण्यात यावी.

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

कामरांच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. काहींनी आंदोलनाचा विषय आणि धार्मिक संदर्भ यांचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केला. तर काहींनी या वक्तव्यावरून आंदोलनाच्या स्वरूपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

CJP च्या मंचावरून कुणाल कामरा यांनी 'सीतेच्या पती' असा उल्लेख करत वक्तव्य केले. यापूर्वीही या मंचावर 'जय श्रीराम' घोषणेवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भगवान श्रीरामांचा अपमान करण्यात आला आहे," असा दावा एकाने सोशल मीडियावर केला आहे.

Sonam Wangchuk Protest Kunal Kamra  Remark News
Pune Metro Line 3: 12 रुपयांत प्रवास, पण प्रतीक्षा कायम! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला प्रशासनाचा 8 वा मुहूर्त

दुसरीकडे, काहींनी हे सरकारवरील राजकीय भाष्य असल्याचे सांगत कामरांच्या वक्तव्याचे समर्थनही केले. त्यामुळे सोशल मीडियावर या मुद्द्यावर दोन भिन्न मतप्रवाह दिसून येत आहेत.

20 जुलैच्या मोर्चासाठी हाक

सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच असून त्यांचे वजन घटत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असताना त्यांनी समर्थकांना उपोषण सोडण्याची विनंती करण्याऐवजी 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही पत्राद्वारे वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही या आंदोलनाला समर्थन दिले आहे. मात्र, आंदोलनाच्या 19 व्या दिवशीही केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Sonam Wangchuk Protest Kunal Kamra  Remark News
Sachin Ahir: दोन सरकारी बंगले हुकले! अखेर पदरी आला फ्लॅट; सचिन अहिर शिंदेंकडे मागणार दाद?

कुणाल कामरा काय म्हणाले?

जंतर-मंतरवरील आंदोलनात बोलताना स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केंद्र सरकारवर टीका करत एक टिप्पणी केली. 'हे सरकार अनेक वर्षांपासून एकच गोष्ट करत आहे. सीतेच्या पतीचे नाव घेतात, पण काम मात्र नीताच्या पतीचे करतात." त्यांच्या या वक्तव्यातील 'नीताच्या पती' या उल्लेखाचा संदर्भ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी जोडला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

वक्तव्यानंतर टाळ्या

सरकारवर उद्योगपतींना लाभ मिळवून दिल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर कामरा यांनीही सरकारवर टीका केली. मात्र, भगवान राम यांचा थेट उल्लेख टाळून "सीतेचे पती" असा संदर्भ वापरत विनोदी शैलीत केलेल्या भाष्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. उपस्थितांपैकी काही जणांनी त्यांच्या वक्तव्यानंतर टाळ्या वाजवल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत असून त्यावरूनही टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com