Ramdas Athawale  Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale News : वाहतूक कोंडीत लोकं त्रस्त, त्यात आठवलेंचा 'रॉंगसाईड'ने प्रवास ! अखेर पोलिसांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी...

Thane Politics News : ठाण्यात आठवलेंच्या ताफ्याला बुधवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

सरकारनामा ब्यूरो

Thane : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेहमीच राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतात. कधी विरोधी पक्षातील नेत्यांना टोले, तर कधी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना केलेल्या विनोदात्मक कविता. पण आठवले बुधवारी एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले. ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही. दुपारच्या सुमारास या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असताना केंद्रीय मंत्री आठवले यांच्या गाड्यांचा ताफा कसलीही पर्वा न करता थेट 'रॉंग साईड'ने पुढे आला. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीतून त्यांना अखेर पोलिसांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच बाहेर काढले.

ठाण्यातील नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ताफ्याला बुधवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मात्र, वाहतूक कोंडी झालेली असताना मंत्री आठवलें(Ramdas Athawale) च्या गाड्यांचा ताफा थेट चुकीच्या मार्गाने पुढे गेला.

यावेळी कायदा शिकवणाऱ्या पोलिसांकडून चुकीच्या मार्गावरील ताफ्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला जात होता. त्यातच मनसे(MNS)चे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनीही वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडे न पाहता आठवलेंचा ताफामध्येच थांबवून या कोंडीत भर पाडली.

ठाणे शहरातील वाहतूककोंडी समस्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी ' तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणे ' अशी आहे. सर्वच महामार्गांवर नागरिकांना वाहतूककोंडीचा रोजच सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेला सुध्दा पुढे जायला जागा मिळत नाही. या कोंडीतून सुटका होण्यासाठी तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडतो.

कारण ज्या शासन, प्रशासनाकडे तक्रार करावी त्यांच्याकडूनच या मागणीकडे दुर्लक्ष व्हावे, केवळ दुर्लक्षच नव्हे तर वाहतुकीचे नियम मोडून त्यांनीच वाहतूक कोंडी करावी, मग अशावेळी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? काहीसा असाच प्रकार साकेत पुलावर नाशिक महामार्गावर घडला.

एखादी रुग्णवाहिका वाहतूककोंडी अडकली असेल तर त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी धडपड करणे याचे समर्थन होऊ शकते, पण ज्यांनी हे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी ज्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनीच वाहतुकीचे नियम मोडावेत हे चांगले नाही असेही वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या नागरीक म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT