Ramdas Athawale On NDA : रामदास आठवलेंचं ठरलं ! शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी नड्डांनी दाखवला हिरवा कंदील?

Ramdas Athawale On Shirdi loksabha Seat : भाजपची आठवलेंच्या उमेदवारीला अनुकूलता?
Ramdas Athawale On NDA :
Ramdas Athawale On NDA :Sarkarnama

Pandharpur News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पुनरुच्चार केला आहे. शिर्डीतील उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबत चर्चा झाल्याचा दावाही आठवले यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना केला. (Latest Marathi News)

Ramdas Athawale On NDA :
Ahmednagar Politics : माजी खासदार वाकचौरे 'शिवबंधना'साठी मातोश्रीकडे रवाना; ठाकरेंना मिळणार बळ?

रामदास आठवले यांचे शिर्डीतून लोकसभा उमेदवारी साठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून हिरवा कंदील असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आठवले यांनी याआधीही अनेकदा वक्तव्ये केलेली आहेत. एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सोबत असलेल्या दलित मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपची त्यांच्या उमेदवारीला अनुकूलता असल्याची चर्चा आहे. आठवले यांनी शिर्डीसह लोकसभेसाठी आरपीआयला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी नड्डा यांच्यासमोर ठेवली आहे.

Ramdas Athawale On NDA :
NCP Solapur Politics : मंगळवेढ्यात शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादीतील नाराज गट अजित पवारांच्या गळाला ?

मनसेवर भाष्य -

पंढरपूरमधील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या घरी आठवलेंनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी राज ठाकरे एनडीए सोबत आले तर स्वागत करू असे पहिल्यांदाच म्हणाले आहेत. यापूर्वी आठवले यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याबाबत असहमती दाखवली होती. मात्र आता त्यांनी सूर बदलत, राज हे लोकप्रिय नेते आहेत, त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते, असे म्हणत रामदास आठवलेंनी स्तुती सुमने उधळली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com