Kolhapur NCP News : राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा उद्या (ता. २५) कोल्हापुरातील दसरा चौकात पार पडत आहे. राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता जागा करण्यासाठी आमदार रोहित पवार कोल्हापूरात ठाण मांडून आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी आमचे कार्यकर्ते पवार साहेबांच्या सभेला जातील, असं उत्तर देत रोहित पवारांच्या आरोपांची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या NCP फुटी नंतर निष्ठावंतांची तिसरी सभा कोल्हापुरातील दसरा चौक मैदानात पार पडत आहे. शुक्रवारी साडेचार वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांच्या उपस्थितीत व छत्रपती शाहू महाराज हे अध्यक्षस्थानी राहून ही सभा पार पडणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
या पार्श्वभूमीवर गेली दाोन दिवस राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता जागा करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पिंजून काढला. आजोबांसाठी नातवाची धडपड सगळ्यांच्या नजरेत येते. त्याची चर्चा देखील जिल्ह्यात सुरू आहे.
या दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या आरोपाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी, आमचे कार्यकर्ते पवार साहेबांच्या सभेला जातील, असं उत्तर देत आमदार रोहित पवार यांच्या आरोपांची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमके काय म्हणाले मुश्रीफ?
शरद पवार साहेब यांच्यामुळेच आम्हाला राजकारणात स्थान मिळाले हे आम्ही कधीच नाकारू शकत नाही. कोल्हापुरातील सभेत शरद पवार साहेब काय बोलणार? हे ऐकायला सांगली, इस्लामपूर मधून लोक येणार.आमचे लोकही तिथे येणार. साहेबांच्या सभेला गर्दी व्हावी, या माझ्याकडून शुभेच्छा आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.
Edited By Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.