Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटल सेतू-मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू मार्गाचं उद्घाटन झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना मोदींनी विकासाच्या मुद्यांवर भाष्य केलं. विकासकामं पूर्ण करणं हीच मोदींची गॅरंटी असून 'भारत संकल्प यात्रे'च्या माध्यमातून मोदींची गॅरंटी सुरू झाली आहे. जिथे मोदींची गॅरंटी सुरू होते, तिथे दुसऱ्यांची संपते, असा टोला विरोधकांना लगावला आहे.
विकासकामासांठी आपण समुद्राच्या लाटांनाही टक्कर देऊ शकतो. मी सांगितलं होतं, की देश बदलणार, कारण ही मोदींची गॅरंटी होती. देशातील विविध विकासकामं पूर्ण करणं हीच मोदींची गॅरंटी आहे. येणाऱ्या काळात मुंबईकरांना बुलेट ट्रेनही मिळणार आहे. मात्र, काही लोकांची निष्ठा फक्त तिजोरी भरण्यासाठी असते. पण आता मोदींची गॅरंटी सुरू झाली आहे, असा जोरदार हल्लाबोल मोदींनी विरोधकांवर केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण अभियानाची गॅरंटी दिलेली आहे. आता राज्य सरकारदेखील ती योजना पुढे घेऊन जात आहे. माता-भगिनींचे जीवन सुखकर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. 'सुकन्या'सारख्या अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी देशात केलेल्या कामांचा दाखला देत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. '10 वर्षांपूर्वी हजारो करोडोंच्या घोटाळ्याची चर्चा होत असे. पण आता या प्रकल्पाची चर्चा होतेय,' असा टोला मोदींनी लगावला.
'मी 2014 ला रायगड किल्ल्यावर गेलो होतो. त्यावेळी काही संकल्प केले होते. यानंतर आज हा संकल्प पूर्ण होत आहे. मागील 10 वर्षांत भारत खूप बदलला आहे. अटल सेतूबद्दल लोकांमध्ये चर्चा होत असून या कामासाठी जपानची मोठी मदत झाली आहे'. जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांचीही त्यांनी यावेळी आठवण काढली.
या अटल सेतूसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. याची एकूण लांबी जवळपास 22 किलोमीटर आहे. या सेतूचा 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आहे. तब्बल 17 हजार कोटी रुपये खर्चून या 22 किमी लांबीच्या सेतूची उभारणी करण्यात आलेली आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा हा सागरी पूल असणार आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.