New Mumbai Airport .jpg Sarkarnama
मुंबई

Navi Mumbai Airport : 19 हजार 650 कोटींचा खर्च, हजारो एकरवर उभारणी; आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

New Mumbai Airport inauguration : नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमानतळाला पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात घोषणा केली जाते का याकडे लक्ष लागलं होतं. पण मोदींनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही.

Deepak Kulkarni

New Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातही मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.मोदींच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठं विमानतळ म्हणून पाहिलं जात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते बुधवारी (ता.8) पार पडलं आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री राम नायडू,मुरलीधर मोहोळ,रामदास आठवले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी हेही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं.या विमानतळाची निर्मिती चार टप्प्यात होत आहे. पुढील दोन महिन्यांचा कालावधी हा या विमानतळावरुन प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतूक सुरू होण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाच्या कामाविषयीची माहिती जाणून घेतली. मोदींच्या हस्ते टर्मिनल 1 आणि रनवे 1 चं उद्घाटन झालं आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमानतळाला पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात घोषणा केली जाते का याकडे लक्ष लागलं होतं. पण मोदींनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. दि.बा.पाटील यांचं नाव देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे देण्याविषयीची चर्चाही केल्याचं समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा टप्पा सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे येथे आहे.हा विमानतळ म्हणजे भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे. यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो विस्तार यामुळे नवी मुंबईपर्यंत प्रवासाचा वेळ कमी झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT