Crime news
Crime news Sarkarnama
मुंबई

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला लाच मागणारा पोलिस गजाआड

सरकारनामा ब्युरो

मुंबई - प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशातच एक पोलिस कर्मचाऱ्याने निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला लाच मागितली. या निवृत्त अधिकाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे लाच मागणाऱ्या पोलिस विभागातील वरिष्ठ लिपिकाला तुरूंगात जावे लागले आहे. ( Police arrest a retired police officer for soliciting bribes )

पद्माकर बाबूराव पोटे (वय 57, रा. बदलापूर पश्चिम, जि. ठाणे) असे वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडे रजेचे पैसे नियमित करून देण्यासाठी 60 हजारांची लाच पोटे याने मागितली. पोटेला एसीबीने रंगेहाथ पकडले.

पोलिस अधिकारी सेवानिवृत्त असून त्याचे रजा रोखी करणाचे 300 दिवस पूर्ण झाले नसल्याने 2 लाखाचे नुकसान होईल असे पोटेने सांगितले. तक्रारदार पोलिसास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली.

लाचलुचपत विभागाने सापळा लावला. तडजोड अंती पोटेने 25 हजारांची लाच मागितली. कालांतराने 20 हजार घेऊन काम करून देण्याचे पोटेने सांगितले. दरम्यान 10 हजाराचा हप्ता देताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT