लातूर : लातूर जिल्ह्यातील कन्हेरी गावातील एका शेतकऱ्याकडे मजुराच्या मस्टरवर स्वाक्षरीसाठी पाच हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारतांना ग्रामसेवकाला (Gramsevak) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत औसा येथून अटक करण्यात आली आहे.
कन्हेरी येथील शेतकऱ्यास शासकीय योजनेतून विहीर मंजूर झाली. मात्र या विहिरीच्या कामावरील मजूराचे हजेरी मस्टरवर नावे नोंदवून त्यावर स्वाक्षरीसाठी ग्रामसेवकाने चक्क पाच हजार रुपये लाच मागितली. त्यासाठी शेतकऱ्यानेही तयारी दाखवली. ती घेत असताना लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कन्हेरी गावाचे ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबायणे याला रंगेहाथ पकडले आहे.
शेतकऱ्यांला त्याच्या शेतात विहिर घेण्यास शासकीय नियमानुसार मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार विहिरीचे काम सुरू झाले. मात्र, हे काम करणाऱ्या मजुराच्या मस्टरवर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आवश्यक असते. त्याशिवाय पुढील अनुदान मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याने स्वाक्षरी करण्यास ग्रामसेवकास सांगितले. मात्र, ग्रामसेवक माडीबोयणे याने या मस्टरवर स्वाक्षरीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच औसा येथील मिनार हॉटेल, हाश्मी चौक येथे स्वतः माडीबोयणे शेतकऱ्याकडून मोजून घेत असताना लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आणि त्याच्या विरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.