Kidnapping News Sarkarnama
मुंबई

धक्कादायक : घरभाडं देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून महिलेनं केलं मुलाचं अपहरण

हिरानंदानी-आकृती इमारत परिसरातून एका मुलाचे अपहरण (Kidnapping) झाल्याने खळबळ उडाली होती.

सरकारनामा ब्युरो

मानखुर्द : मानखुर्दच्या हिरानंदानी-आकृती इमारत परिसरातून एका मुलाचे अपहरण (Kidnapping) झाल्याने खळबळ उडाली होती. मानखुर्द पोलिसांनी (Police) या मुलाचा शोध अवघ्या 6 तासांत लावून त्याला सुखरूपपणे पालकांच्या हवाली केले. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने एका महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले होते, असे उघड झाले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव ज्योती बनसोडे (वय ३२) असे आहे. या महिलेकडे आर्थिक चणचणीमुळे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. हिरानंदानी आकृती परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचे काल (ता.16) दुपारी बाराच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या तक्रारीनुसारनुसार उपनिरीक्षक संदीप रहाणे व दत्तात्रय मालवेकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक व हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणाऱ्या पथकाने तपास सुरु केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी सुरू केली. यात गोवंडीतील आगरवाडी येथील दत्त मंदिराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अल्पवयीन व अपहरणकर्ती महिला दिसून आले.

सीसीटीव्हीतून धागेदोरे मिळताच पोलिसांनी ज्योतीचे मोबाईल लोकेशन शोधले. त्यावेळी ती कल्याण रेल्वे स्थानकात होती. त्यानंतर ती मानखुर्द परिसरात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. मुलाबाबत तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. या मुलाला तिने बोईसरच्या काटकरपाडा परिसरात नेऊन सोडल्याचे सांगितले होते. नंतर पोलिसांनी बोईसर येथून त्या मुलाला ताब्यात घेऊन सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या हवाली केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT