Praful Patel Statement On Jiretop : Sarkarnama
मुंबई

Praful Patel News : जिरेटोप प्रकरणावरुन अखेर पटेलांना उपरती; 'यापुढे काळजी घेऊ...'

Praful Patel Statement On Jiretop : अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेले जिरेटोप भेट म्हणून दिला. इतकेच नाही तर जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवला.

Chetan Zadpe

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगाला एका वादाची किनार चिटकली. अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेले जिरेटोप भेट म्हणून दिले.

इतकेच नाही तर जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवले. आता यावरुन वाद उफाळून आला नसता तरच नवल. विरोधकांनी मोदी आणि पटेलांना या मुद्द्यावरुन निशाण्यावर घेतले. जोरदार टीका केली. आता प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल पटेल यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. पटेल म्हणाले, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ," अशा शब्दात पटेल यांनी अखेर उपरती झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरेंनी केली होती टीका -

पालघर लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी मविआची काल वसईत सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेलासह भाजपचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यांनी प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्याच्या कृतीचा जाहीर निषेध केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान मोदींचा (Narendra Modi) अर्ज भरायला प्रफुल पटेल गेले होते. पटेल आता तुम्ही लाचार झाला आहात. मोदींच्या चरणी लीन झाला आहे. तेथे लीन होताना महाराजांची टोप ठेवता, अजून किती झुकणार आहात? असे खडेबोल ठाकरेंनी पटेलांना सुनावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT