Uddhav Thackeray Attacks BJP : 'अब की बार भाजप तडीपार'; उद्धव ठाकरेंचा महाडमधून एल्गार

Mahad Meeting : भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी शहिदांचा, बजरंग बलीचा आधार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray in Konkan : निवडणुका आल्या की घोषणांचा पाऊस पडतो. जुमल्यांना फसून लोक आपले सोन्यासारखे मत देतात. पुढे दिलेली आश्वासने विसरण्यासाठी समजात तेढ निर्माण केला जातो. दंगली घडविल्या जातात. भाजप महागाई, बेराजगारीवर न बोलता फक्त हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरते. तेच कर्नाटकमध्ये होत आहे. सध्या देशात दडपशाही सुरू आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे जात आहे. आता २०२४ मध्ये भाजप निवडून आले तर ही शेवटची निवडणूक ठरेल. लोकशाही टिकविण्यासाठी 'अब की बार भाजप तडीपार' असा एल्गार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ....तर बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाहीच : उद्धव ठाकरेंचे सरकारला खुले आव्हान

रायगडमधील महाड येथे शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकार थेट निशाणा साधला. ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरी टीका केली.

ते म्हणाले, "आता आपले मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी गेले आहेत. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत आक्षेपार्ह्य विधान केले. सीमा भागातील मराठी लोकांबाबत कर्नाटचे मंत्री बोलतात मात्र मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) शांत आहेत. बाळासाहेबांचे नाव घेऊन तेथे गेले आहेत. त्यांनी स्वाभिमान असले तर कर्नाटक सरकारचा निषेध करावा. मराठीद्वेष्ट्यांचा पराभव करण्याचे त्यांनी तेथे आवाहन केले असते. मुख्यमंत्री देशभर फिरले मात्र तळे येथे आले नाहीत."

Uddhav Thackeray
Sushma Andhare on Barsu : बारसूतील परप्रांतियांच्या जमिनींच्या व्यावहाराबाबत बोला; सुषमा अंधारेंचे सोमय्यांना आव्हान

भाजपकडे विकासाचे मुद्द नाहीत. त्यामुळे ते मन की बात वर निवडणुकीच्या प्रचारात बोलत असल्याची टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. प्रचार करताना कुठलाही पक्ष लोकांच्या समस्यांवर बोलतो. भाजप मात्र मन की बातवर बोलत आहे. भाजपने जाहीर केलेल्या अनेक योजना विस्मरणात गेल्या आहेत. उज्ज्वाल गॅस मिळत नाही. अच्छे दिन आले नाहीत. यावर कुणी बोलले तर त्यांना तुरुंगात टाकले जाते. पंतप्रधान मोदी यांना निवडणूक जिंकण्यासाठी आता बजरंग बलीच्या बलाचा आधार घ्यावा लागत आहे."

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ....तर बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाहीच : उद्धव ठाकरेंचे सरकारला खुले आव्हान

भाजपने (BJP) निवडणूक जिंकण्यासाठी देशातील सैनिकांच्या बलिदानाचा उपयोग करून घेतल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. ठाकरे म्हणाले, "जम्मू काश्मिरचे माजी राज्यपालांनी पुलवामा घटनेला भाजप सरकारला जबाबदार धरले आहे. त्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले आहे. त्या शहिदाचा उपयोग त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी केला. यावर बोलले तरी सत्यापल सिंह (Satyapal Singh) यांची सीबीआय चौकशी सुरू केली आहे. या सरकारला पायउतार केले पाहिजे. जसे सैनिकांकडे बुलेट असते त्याप्रमाणे आपल्याकडे बॅलेट आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com