Prajakta Mali at a public event praising Devendra Fadnavis, followed by a sharp response from Sushma Andhare Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare : "बापाप्रमाणे कठोर अन् आईचं ममत्व..."; CM फडणवीसांचं तोंडभरून कौतुक करणाऱ्या प्राजक्ता माळीवर अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare On Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'नारी शक्ती वंदन' या महिला संमेलनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतक केलं. कार्यक्रमात बोलातना ती म्हणाली की, "सध्या भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत कठोरपणे हाताळलं आहे."

Jagdish Patil

Mumbai News, 17 Apr : प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचा निमित्त ठरलं आहे. तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून केलेलं कौतुक. मात्र, आता तिने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र प्राजक्तावर जोरदार निशाना साधला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'नारी शक्ती वंदन' या महिला संमेलनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतक केलं. कार्यक्रमात बोलातना ती म्हणाली की, "सध्या भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत कठोरपणे हाताळलं आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येकानं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे हे शिकलं पाहिजे. शिवाय मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात भोंदूबाबामुळे जे काही घडत आहे, हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांनी अतिशय संवेदनशीलतेने हाताळला. जिथे बापाप्रमाणे कठोर व्हायला पाहिजे, तिथे ते कठोर होतात आणि जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं गोष्टी हाताळतात.", असं प्राजक्ताने म्हटलं.

शिवाय आपण जेव्हा त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो. तेव्हा त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या तोंडातून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला मी आजपर्यंत ऐकला नाही. चुकीचा शब्द नव्हे त्यांचा सूरही कधी ढळलेला मी पाहिलेला नाही, अशा शब्दात प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र तिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये लिहिलं, "प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो.

पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते जास्त हास्यास्पद वाटायला लागेल, #झाकलीमूठलाखाची" असं सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून प्राजक्ता माळीवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT