Prakash Ambedkar, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar Letter To Sharad Pawar : आंबेडकरांनी पवारांना धाडलं पत्र; आरक्षण बचावासाठी केलं मोठं आवाहन

OBC Vs Maratha Reservation : आंबेडकर यात्रेच्या माध्यमातून ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणार आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. तर ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके सरसावले आहेत. राज्यात निर्माण झालेली आरक्षणाची गुंतागुंत सोडवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

दरम्यान, वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र दिले आहे.

आंबेकर 25 जुलै रोजी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू करणार आहेत. या यात्रेदरम्यान ते त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देणार आहेत. ही यात्रा राज्यातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाही यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे. आता आंबेडकर यांनी शरद पवारांना Sharad Pawar यात्रेत सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले आहे.

पत्रात आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. ही यात्रा अनेक शहरे, गावागावांतून जाणार आहे. यातून ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणार आहे. त्यांच्या हक्कांच्या लढण्यासाठी ही यात्रा असणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या यात्रेच्या माध्यमातून 57 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे, एससी, एसटी आणि ओबीसींसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण, एससी/एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्तीचा विस्तार आदी मुद्द्यांवर भर देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

या बचाव यात्रेला 25 जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जाणार आहे. यात्रा २६ जुलै रोजी किंवा यात्रेदरम्यान कोणत्याही वेळी कोल्हापुरात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही माझ्यासोबत यात्रेत सामील व्हाल, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

आंबेडकरांची आरक्षण बचाव ही यात्रा मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद अशी असणार आहे. या यात्रेचा समारोप औरंगाबाद येथे होणार आहे. आता आंबेडकर यांच्या आवाहानानंतर छगन भुजबळ Chhagan Bhujbal, शरद पवार आदी नेते यात्रेत सहभाग घेणार का, याची उत्सुकता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT