Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत वंचित काँग्रेस यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महाविकास आघाडीसोबत वंचितच्या बैठका झाल्या मात्र वंचित स्वबळावर लढत आहेत. मात्र, विधानसभेत काँग्रेस आणि वंचित VBA एकत्र लढू शकते, विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
'सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस Congress एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी केले. तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढणार, असे भाकीत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप चारसौ पारचा दावा करत असले तरी भाजपचे 170 पेक्षा जागा येणार नाहीत. नवीन सर्व्हेनुसार भारत 200 पारदेखील करत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे आंबेडकर म्हणाले .
काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे. पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.