Kolhapaur News : विरोधकांनी आपली रणनीती बदलली आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर सीएए रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. सीएए जर रद्द करायला गेले तर काँग्रेसचा हाल काय होईल, हे त्यांना माहीत आहे का, असा सवाल करीत मात्र सीएए कायदा रद्द करू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
कोल्हापुरात तपोवन मैदानावर लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. (Narendra Modi News)
कोल्हापूरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब म्हटले जाते. येथील स्थानिक तरुणांमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. जर मी तुम्हाला फुटबॉलच्या भाषेत सांगायचे झाले, तर काल दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टप्प्याची जबाबदारी आता कोल्हापूरकरांवर असणार असल्याचेही या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
एका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा (Congress) फॉर्म्युला आहे. त्याचेच नियोजन आता हे करत आहेत. देशावर पाच वर्षांत पाच पंतप्रधान थोपवण्याच्या तयारीत आहेत. हे लोकांना सहन होणार नाही. भाजपवरील (Bjp) राग काँग्रेस सरकार जनतेवर काढत आहे. दक्षिण भारताला तोडून दुसरा देश तयार करण्याच्या नादात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रामाचं निमंत्रण नाकारले त्यांच्यावर विश्वास ठेवणार का ?
अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचे पाचशे वर्षांपूर्वीच स्वप्न पूर्ण झाले आहे. काँग्रेसने त्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला आहे. अयोध्यातील ट्रस्टी मंडळींनी त्यांना घरी जाऊन निमंत्रण दिले होते. पण त्यांनीही त्यांचं निमंत्रण नाकारले आहे. ज्यांनी रामाचं निमंत्रण नाकारलं त्या लोकांच्यावर विश्वास ठेवणार का ? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला.
नकली शिवसेना काँग्रेससोबत फिरत आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ही गोष्ट पटली असेल का, त्यांच्या मनावर त्याचा परिणाम काय होत असेल. काही लोक औरंगजेबाला मानणाऱ्यांकडे गेले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे लोक चालले आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर यांच्या वागण्याने सर्वाधिक दुखी ते झाले असते, अशी टीका मोदी यांनी केली.
आताचं राजकारण करणारे दलितांच्या राजकारणावर निवडून आले आहेत. मतासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाईल. काँग्रेसने अशी एक गोष्ट जाहीर केली आहे, जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे. पै-पै जमा केलेले पैसे काँग्रेसला लुटू देऊ नका. महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. मात्र काँग्रेसने सामाजिक हत्या करण्याचा डाव आखला आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
भारतीय जनता पार्टीने मुद्रा योजनेची मुद्दल 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भाजपकडे विकसित भारताची गॅरंटी आहे. आणखी एक मोदींची गॅरंटी आहे. पाच सहा वर्षांत महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सबलीकरण होत आहेत. तीन करोड महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प आहे.
कोल्हापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार प्रयत्न करत आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गाचे काम सुरू आहे. भविष्यात वंदे मातरम ही चालेल. कोल्हापूर-वैभववाडी रस्त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोकणाशी संपर्क वाढणार आहे. शक्तिपीठ मार्गाच्या माध्यमातून लाखो भाविक कोल्हापुरात येतील, असेही मोदी म्हणाले.
(Edited By : Sachin Waghmare)
R