Prakash Mahajan On Sanjay Raut .jpg Sarkarnama
मुंबई

Prakash Mahajan: नारायण राणेंशी पंगा घेतल्यानंतर आता संजय राऊतांवर 'फायर'; प्रकाश महाजन म्हणाले, 'सुमार कुवतीची माणसं...'

Sanjay Raut News: फडणवीसांना माझ्याकडे पैसा आहे, मी सर्वांना नाचवू शकतो असं वाटतं. परंतु, ठाकरे ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. त्याला कोणीच संपवू शकत नाही. हा ब्रँड अजिंक्य आहे. लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आदर असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यात शा‍ब्दिक चकमकी उडाल्या होत्या. या चकमकीत राणेंची दीड दमडी ते उलट्यापर्यंत टीकेची पातळी घसरली होती. तर महाजनांनीही दंड थोपटून महाराष्ट्रात राणेंना कुणीतरी नडू शकतो हे दाखवून दिले होते. आता हा वाद मिटत नाही, तोच मनसेच्या प्रकाश महाजनांनी आता संजय राऊतांना (Sanjay Raut) फैलावर घेतलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली, त्याची सर्व माहिती आपल्याकडे आहे, असा दावा केला होता. देवेंद्र फडणवीस स्वत:ला मदारी समजत आहे.एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहत आहे. परंतु,महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवणार आहे,असे राऊतांनी म्हटलं होतं. आणि तेच प्रकाश महाजनांना खटकलं आहे.

मनसे नेते प्रकाश महाजनांनी (Prakash Mahajan) थेट संजय राऊतांवर शा‍ब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, मुख्यमंत्री स्वतःहून भेटले काय? आणि राज ठाकरे स्वतःहून भेटले काय? त्यात फरक काय आहे. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि राज ठाकरे हे राज ठाकरेच राहणार आहेत. शब्दाचा छळ करून,आपली निष्ठा दाखवण्यासाठी दोन माणसांमध्ये कशाला ओढता?,असा संतप्त सवालही यावेळी महाजन यांनी राऊतांना केला होता.

यावेळी प्रकाश महाजन म्हणाले, महंमद पर्वताला भेटला काय? पर्वत महंमदला भेटला काय? महत्वाचे हेच आहे की भेट झाली. मुख्यमंत्री स्वतःहून भेटले तरी ते मुख्यमंत्रीच राहणार आहेत,आणि राज ठाकरे स्वतःहून भेटले तरी ते राज ठाकरेच राहणार आहेत, त्यांच्यात काय बदल होणार आहे? असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

राऊत यांचे बोलणे हे शाळेतील पोरासारखे आहे, कोण आधी कोणाला भेटले? संजय राऊत यांनी मावळ अपघाताविषयी बोलायचे सोडून, कोण कोणाला भेटले असे बोलणे म्हणजे पोरखेळ असल्याची खोचक टीकाही महाजन यांनी केली आहे.

संजय राऊतांना सुमार कुवतीची लोक असले की असं होतं, असा चिमटाही त्यांनी काढला.तसेच ते मोठे आणि अनुभवी नेते असून मी त्यांना काय बोलावे? फक्त राऊतांनी दोन महिने गप्प राहिले तर, या महाराष्ट्राचे खूप चांगले होईल अशी खोचक टीकाही महाजनांनी केली.

संजय राऊतांचं विधान काय..?

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. माझ्याकडे पैसा आहे, मी सर्वांना नाचवू शकतो. परंतु ठाकरे ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. त्याला कोणीच संपवू शकत नाही. हा ब्रँड अजिंक्य आहे. लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आदर असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT