MLA Prakash Surve seen apologizing with folded hands after his controversial comment about the Marathi language caused outrage. Sarkarnama
मुंबई

Prakash Surve News : ‘मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी, आई मेली तरी चालेल..’ म्हणणाऱ्या शिंदेंच्या आमदाराने सामंतांशेजारी बसून जोडले हात

Prakash Surve’s Controversial Statement on Marathi Language : सुर्वे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. मनसे नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी सुर्वे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

Rajanand More

Prakash Surve Issues an Apology with Folded Hands : मागील काही दिवसांपूर्वी मराठी विरूध्द हिंदी असा वाद पेटला होता. त्यावेळी मराठी विरूध्द उत्तर भारतीय असा रंग काही नेत्यांनी त्याला दिला होता. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकार सुर्वे यांच्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मराठी माझी आई, ती मेली तरी चालेल, असे विधान त्यांनी केले होते. त्यावरून टीका होऊ लागल्यानंतर त्यांना उपरती झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने मुंबईत मराठी आणि अमराठी हा वाद वाढण्याची शक्यता आहे. महायुतीने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच सुर्वे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी. आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको, कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही दिले आहे. हे प्रेम असंच ठेवा, असे विधान केले होते.

सुर्वे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. मनसे नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी सुर्वे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आता सुर्वे यांना आपली चूक उमगली आहे. शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशेजारी असतानाच त्यांना या विधानाबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे.

मराठी आमची मायमाऊली आहे. अनावधानाने माझ्या तोंडातून तसे शब्द केले. मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सुर्वे म्हणाले. उदय सामंत यांनीही त्यांच्या तोडून चुकून असे शब्द आल्याचे म्हटले. दरम्यान, सुर्वे यांच्या या विधानावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता.

“माय मरो मावशी जगो” हे वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आणि लाचार आहे. ‘माय’ म्हणजे महाराष्ट्र आणि ‘मावशी’ म्हणजे उत्तर प्रदेश. अशा प्रकारे बोलणे एका आमदाराला शोभत नाही. माफी मागून काही होणार नाही, कारण माफ करणं हे माझ्या हातात नसून मराठी माणसांच्या हातात आहे. निवडणुकीतच त्यांना उत्तर मिळेल. अशा प्रकारचं वक्तव्य आमच्या पक्षातील कोणाकडून झालं असतं तरी आम्ही त्याचाही निषेध केला असता. प्रकाश सुर्वे यांनी केलेली चूक गंभीर आहे आणि अशी चूक पुन्हा होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असे ठाकरे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT