Shashi Tharoor News : शशी थरूर यांच्यामुळे राजकारणात वादळ; भाजप नेता म्हणाला, माझ्यासोबत काय झाले, हे तुम्हाला माहित...

Shashi Tharoor’s Remark Triggers Political Uproar: शशी थरूर यांच्या या लेखावर भाजपने निशाणा साधला आहे. प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, थरूर हे ‘खतरों के खिलाडी’ बनले आहे.
Congress Leader Shashi Tharoor
Congress Leader Shashi TharoorSarkarnama
Published on
Updated on

BJP’s Response : Attack on Gandhi Family Over Dynasty Politics : काँग्रेस नेते व केरळातील खासदार शशी थरूर हे मागील काही महिन्यांपासून पक्षापासून दुरावल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून काहीवेळा पक्षाच्या भूमिकेविरोधात मतं व्यक्त करत असताना दिसून आले. आता पुन्हा एकदा त्यांच्या एका लेखामुळे वादळ उठले आहे. त्यांनी थेट राजकीय वंशवादावर त्यामध्ये भाष्य केल्याने भाजपने त्याचे कनेक्शन थेट गांधी कुटुंबाशी जोडले आहे.

थरूर यांनी ओपिनियन पोर्टल प्रोजेक्ट सिंडिकेटवर हा लेख लिहिला असून भाजपला काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची आयती संधी मिळाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा लेख आल्याने आता निवडणुकीच्या प्रचारातही त्याचा भाजपकडून वापर केला जाण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले आहेत थरूर?

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, विदयमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह नेहरू-गांधी कुटुंबाचा प्रभाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी जोडला गेला आहे. पण त्याने राजकीय नेतृत्व हा जन्मसिध्द अधिकार असू शकतो, हे मत तयार झाले आहे, असे थरूर यांनी लेखात म्हटले आहे.

Congress Leader Shashi Tharoor
Election Commission Update : विरोधक दिल्लीत, निवडणूक आयोग आजच महाराष्ट्रात करणार मोठी घोषणा; वेळ ठरली...

भाई-भतीजावादामुळे सरकारचे कसे नुकसान होते, यावरही थरूर यांनी भाष्य केले आहे. योग्यता, प्रतिबध्दता आणि लोकभावनांचा विचार न करता केवळ वंशावर आधारित राजकीय सत्ता मिळणार असेल तर त्यामुळे सरकारची गुणवत्ता प्रभावित होते. उमेदवाराची गुणवत्ता जेव्हा त्यांचे आडनाव ठरविते, तेव्हा ते अधिक चिंताजनक असल्याचेही मोठे विधान थरूर यांनी केले आहे.

थरूर यांच्या या लेखावर भाजपने निशाणा साधला आहे. प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, थरूर हे ‘खतरों के खिलाडी’ बनले आहे. त्यांनी थेट वंशवाद किंवा घराणेशाहीतील नवाबांवर बोट ठेवले आहे. सर, जेव्हा मी 2017 मध्ये राहुल गांधी यांच्याविषयी बोललो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे माझे काय झाले? मी, तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. पहिले कुटुंब खूप सूड घेणारे आहे, असेही पुनावाला यांनी म्हटले आहे.

Congress Leader Shashi Tharoor
Chhagan Bhujbal : बिहारमध्ये प्रचारात बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास मनाई, उमेदवार म्हणाला मग उमेदवारीच नको..

काँग्रेस नेत्यांनी थरूर यांच्या या लेखावरून प्रत्युत्तर दिले आहे. उदित राज यांनी म्हटले की, ‘घराणेशाहीचा दृष्टिकोन केवळ राजकारणापर्यंत मर्यादित नसून सर्व क्षेत्रांत आहे. एका डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो. व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी बनतो. नायडूंपासून पवारांपर्यंत, डीएमकेपासून ममता बॅनर्जीपर्यंत, मायावतींपासून अमित शहांच्या मुलापर्यंत, अशी अनेक उदाहरणे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com