Nitin Gadkari News : वडील भिडले आता मुलगाही नितीन गडकरींना भिडणार; निवडणुकीत हा मुद्दा भाजपला सतावणार?

Ketan Thakre Questions Nitin Gadkari’s Dream Project : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आला. त्यात प्रदूषित नागनदी स्वच्छ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
Ketan Thakr, Union Minister Nitin Gadkari
Ketan Thakr, Union Minister Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे हेविवेट नेते तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे भिडले होते. त्यांनी गडकरींचे चांगलेच टेंशन वाढवले होते. यात त्यांना विजय मिळाला नसला तरी त्यांचे मताधिक्य घटविण्यात त्यांना यश आले. आता ठाकरे यांचे पुत्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे यांनी गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

नितीन गडकरी यांनी नागपूरची नाग नदी स्वच्छ व शुद्ध करण्याची घोषणा केली होती. या नागदीनतून बोटी चालवल्या जातील, असा दावा त्यांनी केला होता. या नदीचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. मात्र 10 वर्षे झाली तरी डीपीआरनुसार एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. लोकसभा आणि महापालिकेची निवडणूक जवळ आली की नागनदीच्या प्रकल्पाचे काय झाले, अशी विचारणा केली जाते.

दुसरीकडे भाजपच्या वतीने त्याच त्या घोषणा प्रत्येक वेळी केल्या जात आहे. कुठलेच काही झाले नसताना अचानक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आला. त्यात प्रदूषित नागनदी स्वच्छ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. हा रिपोर्ट कोणी तयार केला, कोणी पाहणी केली, प्रदूषण दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या असा प्रश्न सर्वच नागरिकांना पडत आहे.

Ketan Thakr, Union Minister Nitin Gadkari
Shashi Tharoor News : शशी थरूर यांच्यामुळे राजकारणात वादळ; भाजप नेता म्हणाला, माझ्यासोबत काय झाले, हे तुम्हाला माहित...

नागपूर शहरातील सर्व मलवाहिन्या नागनदीत सोडण्यात आल्या आहे. शहराची सर्व घाण याच नदीतून वाहून जाते. त्यामुळे नदी वर्षभर वाहत असते. आजवर या नदीचे पाणी स्वच्छ झाल्याचे कोणालाही आढळले नाही. प्रदूषण मंडळालाच ही नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त झाल्याचे कसे काय दिसले, कोणी सांगितले अशी विचारणा केली जात आहे. या अहवालावर भाजपच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र काँग्रेसला मात्र महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एक मुद्दा प्रचारासाठी हाती लागला आहे.

Ketan Thakr, Union Minister Nitin Gadkari
Election Commission Update : विरोधक दिल्लीत, निवडणूक आयोग आजच महाराष्ट्रात करणार मोठी घोषणा; वेळ ठरली...

आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे यांनी हा मुद्दा आता आपल्या हाती घेतला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागनदी प्रदूषण मुक्त झाल्याचा दावा केला आहे. त्यानुसार ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष नागनदीची पाहणी करण्यात आली. दूषित पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. हे सर्व नमुने केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना पाठवले जाणार आहेत. केतन ठाकरे हे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com