Mumbai, 25 March : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरच्या अटकेचा संदर्भात देऊन सहकार्याच्या तोंडातून तो कोणाच्या आश्रयाखाली लपून बसला होता, हे विधानसभेत वदवून घेतले, त्यामुळे कोरटकरवरून टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी सणसणीत उत्तर दिल्याचे मानले जात आहे.
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. ते देत असताना त्यांनी प्रशांत कोरटकर याच्यावरून टीका करणाऱ्यांना सुनावले आहे. ते म्हणाले, कोरटकर, कोरटकर, आता पकडलं, त्या प्रशांत कोरटकरला. कुठं लपून बसला होता, असा प्रश्न सत्ताधारी बाकाकडे पाहत फडणवीस यांनी विचारला, त्यावेळी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी काँग्रेस, काँग्रेस, काँग्रेसवाल्यांच्या घरी बसला होता, असे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) हा तेलंगणात लपून बसला होता, आता कोणाच्या घरी बसला होता, हे तुम्ही सांगताय. पण, मी सांगणं योग्य दिसत नाही. त्याला कोणी आश्रय दिला हेाता, हे जरा बघा ना नाना पटोले. पण, आपल्याला राजकारण करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर कारवाई केली जाईल. कारण, ते आपले दैवत आहेत, आपल्या दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
नाना पटोले नेहमी म्हणतात, कुंपणच शेत खातंय. पण, आमच्या शेताला कुंपणच नाही. हे खुलं शेत आहे, कोणीही येऊ शकतं, आमच्या शेतामध्ये. मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरिता आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना महायुती प्रवेशाचे निमंत्रण दिल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या न्यायालयात उभे करण्यात आले आहे. सुनावणीत सरकारी वकिलाने आरोपीला एका महिन्यानंतर पकडला गेले आहे... या काळात त्याला कोणी मदत केली, याचाही तपास कारण गरजेचं आहे, त्यासाठी आरोपीकडे चौकशी करावी लागेल. पळून जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला, त्याचा मालक कोण आहे, याचाही शोध घ्यावा लागणार आहे, त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलाने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.