Neelam Gorhe Joins Shinde Group Sarkarnama
मुंबई

Neelam Gorhe Joins Shinde Group: शिंदे गटातील प्रवेशानंतर तासाभरातच नीलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव..

Maharashtra Politics : प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Praveen Darekar Withdraw No Confidence Motion: विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनानप्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा ठराव मांडला आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. तर प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे. (Political Web Stories)

उपसभापती नीलम गोऱ्हे या पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते असताना प्रवीण दरेकर यांनी केला होता. यानंतर त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा, असा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला आहे.

"राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांगले काम करत आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे," असे शिवसेना पक्षप्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या..

  • शिवसेनेत मला खूप दिले आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे.

  • केंद्रीय स्तरावर NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध विषयांवर सकारात्मक पावले उचलली आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शाहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे.

  • मी उपसभापती असल्यामुळे त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार (Political Short Videos)

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT