Pravin Darekar, Uddhav thackeray Sarkarnama
मुंबई

Bjp vs Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचे राजकीय मूल्यमापन काय हे समजून घ्यावे, दरेकरांचा हल्लाबोल

Maratha Reservation Pravin Darekar Criticizes Uddhav Thackeray : मराठा आरक्षणावरून प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका...

कृष्ण जोशी

Mumbai News : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष शेवटून पहिला आल्याने उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय मूल्य तपासून घ्यावे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेता येते का ? हे पाहण्याचा अनेकजण केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

बिहारच्या नितीश कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची महाराष्ट्राला आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व सक्षम आहे. सर्व समाजाला बरोबर घेत सर्वांना आरक्षण द्यायची न्याय्य भूमिका महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाची आहे. कायद्यात टिकेल अशा प्रकारचे आरक्षण या सरकारला द्यायचे आहे. नितीशकुमार यांच्या नैतिकतेचा ऱ्हास झाला असून त्यांची री ओढताना अशोक चव्हाण दिसत असल्याचा टोमणाही दरेकरांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय गांभीर्याने काम करत आहे. कधीच सरकार एवढ्या अॅक्शन मोडमध्ये आले नव्हते. शिंदे समिती नोंदणी तपासत आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यलयात नोंदणी तपासण्याची लगबग आहे. जेवढे जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध करून देता येतील तेवढे सरकारने दिले आहे. अजून कर्मचाऱ्यांची गरज असेल तर ते ही दिले जातील, असेही त्यांनी दाखवून दिले. आरक्षणाच्या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे हाच उबाठा पक्षाला प्रॉब्लेम आहे. ह्यांची राजकीय दुकानदारी करायला वाव नाही हीच खरी पोटदुखी आहे, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT