Thackeray vs Shinde : मी आवाज उठवल्याने १००० कोटी वाचले; आदित्य ठाकरेंचे CM शिंदेंवर घोटाळ्याचे आरोप

Aaditya Thackeray Allegations On CM Eknath Shinde : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे....
Aaditya Thackeray, CM Eknath Shinde
Aaditya Thackeray, CM Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : बेस्ट आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून बोनस देण्याची परंपरा आहे, पण कालपर्यंत हा बोनस जाहीर करण्यात आलेला नव्हता. बोनस दिवाळीच्या काही दिवस आधी दिला जातो. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करता येईल आणि त्यांच्या घरोघरी सुख, शांती, आनंद येईल. पण कालपर्यंत हे खोके सरकार मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना विसरले होते, पण एका ट्विटमुळे खोके सरकारला भाग पाडलं. दुपारनंतर बैठक घ्यावी लागली आणि संध्याकाळपर्यंत बोनस जाहीर करावा लागला. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे.

Aaditya Thackeray, CM Eknath Shinde
Sanjay Raut News : पुन्हा लढण्याचा निर्धार केलेले संजय राऊत सावलीप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

मुंबईत महा रस्ते घोटाळा झाला आहे. हे प्रकरण गेल्या ११ महिन्यांपासून लावून धरलं आहे. दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू आणि रस्ते काँक्रीटचे करू, हे मुख्यमंत्री सतत खोटं बोलताहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये ५ हजार कोटींचे कत्राट काढण्यात आले होते आणि नंतर ते रद्द करण्यात आले; मग त्यांच्या मित्राने एक हजार कोटीचं कंत्राट वाढवून मागितलं आणि ते ६ हजार कोटींपर्यंत गेलं. यानंतर मी पत्रकार परिषदेत दोन विषय मांडले होते. सव्वासहाशे कोटींचं अॅडव्हान्स मोबिलायजेशन आणि ४०० कोटींचा फायदा मुख्यमंत्र्यांचा मित्रांना होणार होता. हे दोन्ही विषय मांडल्यानंतर बीकेसीत मोठा कार्यक्रम घेतला गेला. तिथे भूमिपूजन झालं आणि वर्क ऑर्डर घाईघाईत दिल्या गेल्या, पण जानेवारीपासून ३१ मेपर्यंत फारसं काम झालं नाही. पण हा विषय लावून धरल्यामुळे सव्वा सहाशे कोटी अॅडव्हान्स मोबिलायजेशनचे आणि ४०० कोटींचा जो फायदा होणार होता ८ ते ९ टक्के मिळणार होते, ते सर्व रद्द केले गेले. यामुळे आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंबईचे हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

२०२१-२०२२ ची जी कामं आहेत, अडीच हजार कोटींची त्यांनाही सुरुवात झालेली नाही. कारण सगळीकडे कामं थांबवायला सांगितली आहेत. कारण ही कामं सुरू आहेत आणि ही कामं बंद असं कुठेही दिसायला नको. दुसऱ्या बाजूला सहा हजार कोटींची कामं सुरू आहेत, पण कुठेतरी एक मीटर खोदलं आणि बॅरिकेड्स लावून ठेवले. मात्र, रस्त्याची कामं ज्या वेगाने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. ३१ मेपर्यंत ५० रस्त्यांचंही काम झालेलं नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालच्या ट्विटनंतर मुंबई महापालिकेने एक टर्मिनेशनची नोटीस काढली होती. त्यावर रात्री साडेदहा ते अकरा वाजता प्रशासकांनी म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांनी सही केली. आणि दक्षिण मुंबईची जी १६८० कोटींची कत्रांटं होती ती आता रद्द करण्यात आली आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. पण ही कंत्राटं रद्द झाल्यानंतर किती दिवसांत पुढचं टेंडर काढणार? मोठ्या कंत्राटदाराकडे जाणार, की जुन्या कंत्राटदाराला काम देणार? कामं न होण्याची जबाबदारी कोणाची, अधिकाऱ्यांची की कंत्राटदाराची? कामं सुरू कधी होणार? की या पावसाळ्यात ज्या रस्त्यांवर खड्डे पडले तिथे परत खड्डे पडणार? असे सवाल करून आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला घेरलं आहे. मुख्यमंत्र्यांना घोटाळे करायचे आहेत म्हणून तुम्ही त्यांना मदत करणं योग्य नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना लगावला आहे.

Aaditya Thackeray, CM Eknath Shinde
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा धक्का; डोंबिवलीत शिंदेंच्या उपस्थितीत तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com