Pravin Darekar, Bachhu Kadu sarkarnama
मुंबई

Pravin Darekar on Bachhu Kadu : प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला, महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका...

Mahayuti महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना झालेला असतानाच बच्चू कडू यांनी भाजप व महायुतीला आम्हाला विचारात घेण्याबाबत इशारा दिला आहे.

Umesh Bambare-Patil

Parvin Darekar News : प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवरून महायुतीतील नेत्यांवर व पक्षांवर टीका केली होती. यावरून प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांना मोलाचा सल्ला दिला आहे. दरेकर म्हणाले, महायुतीत विसंवाद होईल, असं बच्चूभाऊंनी वक्तव्य करू नये. त्यातून काहीही साधलं जाणार नाही. त्यांच्यासारख्या एका सीनियर नेत्यानं जबाबदारीने बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील लहान पक्षांना भाजपने अद्याप विचारात घेतलेलं नाही. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आम्हाला विचारात घेतलं तर ठीक, अन्यथा ‘आम्ही सर्व खासदार’ अशी मोहीम राबवू, अशी भूमिका घेतली आहे. यावर प्रवीण दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, बच्चू कडू हे एका मतदारसंघापुरते आमदार आहेत.

भाजपला त्यांनीच घडवलं, त्यांनीच उभं केलं, अशा गोष्टी त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. आज तरी ते आमच्या महायुतीत आहेत. त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल, असं बच्चूभाऊंनी वक्तव्य करू नये. त्यातून त्यांचं काय साधलं जाणार, असा प्रश्न करून आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यासारख्या एका सीनियर नेत्यानं जबाबदारीने बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी सध्या जोरदार संपर्क मोहीम राबवली आहे. यावर विचारले असता, प्रवीण दरेकर म्हणाले, बैल गेला अन्॒‌ झोपा केला..,जेव्हा फिरायला हवं तेव्हा फिरले नाहीत. जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे होता. तेव्हा मुख्यमंत्री असून, अडीच वर्षे घरातून बाहेर पडले नाहीत. आता पुलाखालून खूप पाणी गेले आहे. आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बारामतीत सुनेत्रा पवारांना साथ...

बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत होत आहे. भाजपची साथ कोणाला मिळणार यावर दरेकर म्हणाले, शंभर टक्के सुनेत्रा पवार यांना आमची साथ असणार आहे. बारामतीची जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर लढणार असेल, तर अजितदादा उमेदवार देतील. अर्थात सुनेत्रा पवारच उमेदवार असतील. तसे असेल तर आमची साथ त्यांनाच असेल. शेवटी आम्ही एकत्रित युतीत आहोत. जिथे उमेदवार आमच्यातील ज्या पक्षाचा असेल त्यास उर्वरित दोन पक्ष ताकदीने मिळून मदत करणार आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT