Manoj Jarange, Pravin Darekar  Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange News : 'खेळ आटोपलाय, संतुलन ढासळतंय, उपोषण संपलंय, आता काय ते...'; भाजप नेत्याचा जरांगेंवर पलटवार

Political News : भाजप आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यावर शेलक्या भाषेत मनोज जरांगे यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी, मी तुमच्या कसल्याही धमक्यांना भिक घालत नाही, अशा शब्दांत जरांगेंवर पलटवार केला.

Sachin Waghmare

Mumbai News : पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यात अहंकार आला आहे. त्यांच्या डोक्यात अंहकाराची हवा गेलेली आहे. त्यांच्या आंदोलनातील छुपा अजेंडा काय आहे, हा मराठा समाजासमोर आला आहे.

त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होत त्यांनी मविआची सुपारी घेतली आहे, हे स्पष्ट होत असल्याची टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी मुंबईत प्रसार माध्यमाशी संवाद साधला. उपोषणकाळात मनोज जरांगे यांनी भाजप नेत्यांवर व सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आमदार प्रसाद लाड यांच्यावरही शेलक्या भाषेत जरांगे यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी, मी तुमच्या कसल्याही धमक्यांना भीक घालत नाही, अशा शब्दांत मनोज जरांगेंवर पलटवार केला.

खेळ आटोपला आहे, त्यामुळे वारेमाप संतुलन ढासळायला लागले आहे. त्यांचे उपोषण संपलंय, आता काय ते बघून घ्या, प्रकृती चांगली राहिली पाहिजे. उपोषणाकडे सर्व पाठ फिरवतायत, ना कोणी मंत्री येणार ना समर्थक येणार. जगभरात मी अशी उपोषण पाहिली नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मराठा समाजाच्या विषयासंदर्भात त्यांनी किती वेळ घातला. दुसऱ्यांच्या कुंडल्या काढता तेव्हा तुमची देखील कुंडली काढलेली असते. तुमच्या बघून घेतोला आम्ही भीक घालत नाही. जरांगे यांच्या डोक्यात अंहकाराची हवा गेलेली असल्याचा आरोप यावेळी दरेकर यांनी केला.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. ज्यांच्यासाठी राजकीय पोळी भाजत आहेत, त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅबिनेट बैठकीत कसलाच वाद झालेला नाही.

सरकारमध्ये कोणतेही आलबेल नाही हे चुकीचे आहे. राज्य सरकारमधील तीन पक्षात कोणतेही वाद नाहीत. संघाच्या त्या बैठकीबाबत मला फारसे माहिती नाही. मी त्या बैठकीला नव्हतो, असेही यावेळी दरेकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारमधील चार मंत्र्यांवर टीका केली, त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, सध्या मिटकरी हे व्हेरी व्हेरी व्हीआयपी झाले आहेत. 'त्यासोबतच दिल्लीच्या बैठकीत काय झाले हे मला माहिती नाही,' असेही यावेळी बोलताना दरेकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT