Kedar Dighe : धर्मवीर 2 मागे भाजपची नीती? केदार दिघेंना वेगळीच शंका

Kedar Dighe Doubts About Dharmaveer 2 : धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या तोंडी शिवसेनाप्रमुखांच्या मूळ शिवसेनेला बदमान करणारी वाक्य कोंबल्याचा आरोप केदार दिघे यांनी केला आहे. यामागे भाजपची नीती असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
Kedar Dighe
Kedar DigheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीरचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मवारी पहिल्या सिनेमाला आणि त्यातील संवाद खूप गाजले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टायमिंग साधत धर्मवारी 2 हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

परंतु, धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या सिनेमातील संवादावर आक्षेप घेतले आहे. या मागे भाजपची नीती असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मूळ शिवसेनेला कमी लेखण्यासाठी खोटे डायलाॅग लिहून धर्मवीर यांच्या प्रतिमेचा वापर केला जात असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केलाय. तशी त्यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट केली आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर धर्मवीर 2 सिनेमात होताना दिसतो आहे. तसे ट्रेलरवरून तरी दिसते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला (Shiv Sena) कमी लेखण्यासाठी खोटे डायलॉग लिहून त्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचा वापर केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची भाजप नीती आहे का? एकदंर धर्मवीर 2 सिनेमाच्या हेतूवरच केदार दिघे यांनी शंका व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे असते, तर असले उद्योग खपवून घेतले नसते, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.

धर्मवीर 2 सिनेमामध्ये आनंद दिघे यांचे पात्र रंगवणारे अभिनेता प्रसाद ओक यांच्या तोंडी शिवसेनाप्रमुखांच्या मूळ शिवसेनेला बदमान करणारे संवाद दिले आहे. ही संवाद बळजबरी घातल्याचे लगेचच दिसते. धर्मवीर आनंद दिघे यांनी आपले आयुष्य संपूर्ण शिवसेनेसाठी वेचले.

संघटना उभी करण्यासाठी घालवले, त्याच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला कमी लेखणारे डायलॉग धर्मवीर सिनेमात लिहिली गेली आहेत. हा प्रकार कोणत्या हेतूने होत आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे.

मूळ शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी धर्मवीरांच्या प्रतिमेचा वापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खुबीनं करत आहेत. यामागे भाजपची नीती आहे का? असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला.

धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरमधील संवाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मूळ आयुष्याशी काय संबंध? असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केलाय. धर्मवीर आनंद दिघे यांचे पात्र रंगवणारे अभिनेता प्रसाद ओक यांच्या तोंडातील संवादातून फक्त एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मार्केटिंग करून घेतले आहे. मात्र यातून धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमा मलिन होत आहे, याचा विसर एकनाथ शिंदे यांना पडलेला दिसतो, याचा संताप केदार दिघे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com