Pravin Shetty News : वसई-विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुमती जाखड यांच्या अध्यक्षते खाली अवघ्या 20 मिनिटांत संपन्न झाली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे प्रवीण शेट्टी यांनी स्थायीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
वसई-विरार महापालिकेत तिसऱ्यांदा बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. आणि पालिकेत बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील महापौर म्हणून निवडून आले. त्या नंतर आज स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक झाली.
निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी तर्फे माजी महापौर प्रवीण शेट्टी आणि भाजपकडून निलेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर ताबडतोड भाजपचे निलेश चौधरी यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने बहुजनचे प्रवीण शेट्टी यांनी बिनविरोध स्थायी समिती सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
निवडीनंतर प्रवीण शेट्टी यांचे महापौर आजीव पाटील, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी महापौर नारायण मानकर , माजी सभापती पंकज ठाकूर, वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत, जगदीश राऊत, माजी नगराध्यक्ष अजय खोखणी आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.