Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

Eknath Shinde Shivsena Rajya Sabha News: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव आडसूळ यांनी यावेळी आपल्याला जे आश्वासन दिले होते त्याबाबत एकनाथ शिंदे यांना आपण वारंवार बोललो होतो. ते या सर्व गोष्टींचे साक्षीदार असल्याचा दावा केला आहे. अमित शाह यांनी स्वत: लेखी आश्वासन दिले होते. तरीही त्याचे पालन होत नसेल तर काय बोलणार असा तीव्र नाराजीचा सूर आडसूळ यांनी आळवला.
Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
Eknath Shinde Jyoti Waghmare .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीचे चेहरे अखेर ठरले आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी गुरुवारी (ता.5) अखेरचा दिवस होता. यादिवशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. कारण शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले होते. पण आता शिंदेंच्या शिवसेनेकडन भाजपच्या पावलावर पाऊल टाकत धक्कातंत्राचा वापर करत ज्योती वाघमारे यांना संधी दिली आहे. यामुळे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गुरुवारी (ता.05) शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, शायना एन्सी, संजय निरुपम, संजय मंडलिक, आनंदराव आडसूळ या सगळ्या दिग्गजांना धक्का देत ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळवली. पण वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यानं नाराजीचा पहिला बॉम्ब फोडला आहे,.

शिवसेनेचै माजी खासदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी राज्यसभेची न मिळताच शिवसेनेसह भाजपवर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले, नाराजी ही मनात ठेवायची की बाहेर काढायची हा प्रश्न आहे. नाराजी ही सर्वांकडेच असते. ज्यावेळी एखादी गोष्ट अपेक्षित असताना ती मिळत नाही, त्यावेळी नाराजी ही असतेच असं विधान करत आपल्याला नाराजीला मोकळी वाट करुन दिली.

एकीकडे आनंदराव अडसूळ यांनी आपली खदखद बाहेर काढतानाच दुसरीकडे मी पक्षाचा जबाबदार नेता असून शिंदे यांच्या वाघमारेंना उमेदवारी देण्याच्या निर्णयावर अधिक काही बोलणार नाही असं स्पष्ट करतानाच भरपूर काही बोलून गेले. आडसूळ यांनी यावेळी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी का दिली, याबद्दल आपण काही बोलणार नसून हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे असंही मत आडसूळ यांनी व्यक्त केलं.

Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
Mumbai BJP News: भाजपकडून मुंबई प्रदेशच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा, वडिलांना खासदारकी,आता उज्ज्वल निकमांच्या मुलालाही मोठी जबाबदारी

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपण राज्यसभेसाठी इच्छुक होतो हे सांगायला तेही विसरले नाही. त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करतानाच दुसरीकडे भाजप आणि अमित शाह यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. भाजपनं एकनाथ शिंदेंसमोर दिलेला शब्द पाळला नसल्याचं सांगत ही येनकेनप्रकारे फसवणूकच असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपने आपल्याला लोकसभा निवडणुकीवेळी राज्यपालपदाचा शब्द दिला होता. हा शब्द अमित शाह यांनी दिला होता. त्यांनी तसे लेखी आश्वासनही दिले होते. पण तो शब्द भाजपकडून पाळला गेला नाही. तसेच भाजपने राज्यपालपद नाही तरकिमान त्यांच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी ही द्यायला पाहिजे होती अशी रोखठोक भावनाही आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखवली.

Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg
Eknath Shinde on Jyoti Waghmare : ज्योती वाघमारेंना उमेदवारी, एकनाथ शिंदेंच्या एका वाक्याने जिंकलं कार्यकर्त्यांचं मन, म्हणाले, 'पक्षात...'

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी यावेळी आपल्याला जे आश्वासन दिले होते त्याबाबत एकनाथ शिंदे यांना आपण वारंवार बोललो होतो. ते या सर्व गोष्टींचे साक्षीदार असल्याचा दावा केला आहे. अमित शाह यांनी स्वत: लेखी आश्वासन दिले होते. तरीही त्याचे पालन होत नसेल तर काय बोलणार असा तीव्र नाराजीचा सूर अडसूळ यांनी आळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com