Prithviraj Chavan Sarkarnama
मुंबई

Video Prithviraj Chavan : महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Roshan More

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर महाविकास आघाडीने पहिल्यांदाच आज (शनिवार) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार असून महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली आहे. राजकारणात कोणी लहान मोठा भाऊ नसतो, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या यशाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या शक्तीच्या विरोधात लढावे लागले. तपास यंत्रणाचा गैरवापर करण्यात आला. मात्र, जनतेने आम्हाला साथ दिली. विविध सामजिक संघटना साथ दिली. या निवडणुकीतून कुठल्याही समाजाला गृहीत धरू नका. असा संदेश शेतकऱ्यांनी दिला आहे.

लोकसभेनंतर काँग्रेस Congress मोठा भाऊ असल्याचा दावा काँग्रेस नेते सांगत होते. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, राजकारणात मोठा भाऊ लहान भाऊ नाही. प्रत्येक मतदारसंघात कोणाची ताकद आहे. मागील निवडणुकीचा देखील आढाव घेवून आम्ही उमेदवार देवू.

विधानसभेला आशीर्वाद

जनेतेने आम्हाला लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला. विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकी पेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल. लोकसभेपेक्षा जास्त आशीर्वाद विधानसभेला मिळेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT