prithviraj chavan-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politic's : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, ‘ते फार गंभीर आहे...’

Prithviraj Chavan Comment On Sharad Pawar Statement : पवारांच्या विधानाचे वेगवेगळे तरंग राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? अशा चर्चा पुन्हा राज्यात सुरू झाल्या आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 10 May : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका मुलाखतीने तसेच, अनौपचारिक गप्पांमध्ये केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मात्र, मुलाखतीमधील एका वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली आहे. सत्तेत जायचं की नाही, हे नव्या पिढीने ठरवायचं आहे, असे जे विधान पवारांनी केले आहे, ते फार गंभीर आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. दोघांनी एकत्र यायचं की नाही, याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. तसेच, सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधात बसायचं, या निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, अशी विधाने पवार यांनी या मुलाखतीदरम्यान केली आहेत.

पवारांच्या विधानाचे वेगवेगळे तरंग राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार एकत्र येणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशा चर्चा पुन्हा राज्यात सुरू झाल्या आहेत. मात्र याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही, त्यामुळे पवारांच्या त्या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे.

दरम्यान, सत्तेत जायचं की विरोधात बसायचं, हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं, या विधानाबाबत माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही ते त्यांच्या पक्षातील ज्युनिअर नेत्यांनी घ्यावा. म्हणजे पवार त्याविरोधात नाहीत, हे स्पष्ट हेाते. सत्तेत जाण्यासाठी बरेच लोक इच्छूक आहेत. त्याला माझी हरकत नाही, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे.

तरुण पिढीकडे जबाबदारी देण्यामध्ये कोणतीही चूक नाही. पवारांनी इतर जी काही विधाने केली आहेत, त्याबाबत माझी हरकत नाही. पण, सत्तेत जायचं की नाही, हे ठरवायचं. म्हणजे तसं झालं तर जायला हरकत नाही, हा विचार जास्त गंभीर आहे. तसं झालं तर ते दुर्दैवी ठरेल, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT