NCP NEWS : राष्ट्रवादीच्या ऐकीच्या चर्चेवर भाजपची प्रतिक्रिया; ‘महाराष्ट्र हिताचा निर्णय अजितदादा अन्‌ सुप्रिया सुळे यांनी घ्यायचाय...’

Sudhir Mungantiwar comment : अजित पवार हे आज महायुतीमध्ये आहेत. ते एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग होणार असेल तर प्रश्न उपस्थित होत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि वन ट्रीलयन डॉलर इकॉनॉमी करण्यात आम्ही सर्व जण एकत्र येऊन काम करत असू तर त्यात महाराष्ट्राचे हितच आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 08 May : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पवारांनी त्याबाबतचा चेंडू मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात ढकलला आहे. त्याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपची दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया आली आहे.

याबाबत ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र यावेत, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमधील नेते हे रक्ताच्या नात्यामध्ये आहेत. जर ते एकत्र येत असतील, तर भारतीय जनता पक्षाचा, त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज महायुतीमध्ये आहेत. ते एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) महायुतीचा भाग होणार असेल तर प्रश्न उपस्थित होत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि वन ट्रीलयन डॉलर इकॉनॉमी करण्यात आम्ही सर्व जण एकत्र येऊन काम करत असू तर त्यात महाराष्ट्राचे हितच आहे. त्यातून महाराष्ट्र हा निश्चितपणे प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकतो. पण, निर्णय हा त्या दोघांनी घ्यायचा आहे, असे सूचक विधानही मुनगंटीवार यांनी केले.

Sudhir Mungantiwar
Uttam Jankar : निवडणुकीत कोब्रा, फितूर म्हणणाऱ्या उत्तम जानकरांना अजितदादांची भूरळ; सत्तेच्या मायाजालामुळे केले तोंड भरून कौतुक!

अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे बहीण-भाऊ आहेत. त्या दोघांनीच निर्णय घ्यायला अडचण काय आहे. ते दोघे एकत्र येतील आणि निर्णय करतील. महाराष्ट्राचे हित होत असेल तर त्यांनी एकत्र येण्याला आमचा काहाही आक्षेप नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar
फडणवीसांच्या निकटवर्तीयाच्या विरोधात शिंदेंची जमावाजमाव; माजी आमदाराच्या घरातून मिळणार चॅलेंज...

दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी एकत्रिकरणाच्या प्रक्रियेबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आपण सत्तेत गेलो पाहिजे, अशी भूमिका मांडली. ती जयंत पाटील यांनी शरद पवारांपर्यंत पोचवली होती. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीत दोन्ही पक्षाच्या एकत्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com