NCP News: दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन आता तिसरा पक्ष तयार होणार? विखे पाटलांचा शरद पवार अन् अजितदादांना सवाल

Radhakrishna Vikhe Patil On NCP Ajit Pawar and Sharad Pawar NCP Will Merger: पक्ष स्वतंत्र ठेवायचा का विलीनीकरण करायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून तिसरा पक्ष काढायचा का हा देखील सर्वस्वी निर्णय त्यांचा असल्याचा खोचक टोला विखे पाटील यांनी मारला.
NCP News
NCP News Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 8 May 2025 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एकत्र यावेत, अशी पक्षातील काही नेत्यांची इच्छा असल्याचं शरद पवार यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

पवारांच्या या विधानानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटले असून अनेक नेत्यांकडून याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन तिसरा पक्ष तयार होणार का असा सवाल उपस्थित केला आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "धरण क्षेत्रामध्ये वाढता अतिक्रमण अनधिकृतपणे धरणामध्ये सोडण्यात येणार सांडपाणी यामुळे धरणातील मासे कमी झाले आहेत. मात्र धरणांच्या बाजूला जी रिसॉर्ट झाली आहेत ती रिसॉर्ट आम्ही धरणच्या बुडत क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगत असले तरी त्यांचं सांडपाणी हे धरणात सोडलं जात आहे. मात्र आता आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.

NCP News
Kolhapur Politics: सप्टेंबरमध्ये निवडणुकांचा धुरळा? नेत्यांचा कस लागणार; गाव पातळीवरचं राजकारण तापणार

धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये जी घर, रिसॉर्ट हॉटेलस या प्रकारची अतिक्रमण असतील ती तातडीने काढण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. धरणाचं पाणी स्वच्छ ठेवणे हे जलसंपदा खात्याचा काम असून जे जे धरणातील पाणी प्रदूषित होण्यास जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे विखे पाटील म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी केलेला वक्तव्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद आहे. दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांनी वेगळे होण्याचे निर्णय घेतला होता. आणि आता त्यांच्यामध्ये समेट होऊन ते एकत्र येणार असतील तर आमचा आक्षेप असण्याचं कारण नाही.

पक्ष स्वतंत्र ठेवायचा का विलीनीकरण करायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून तिसरा पक्ष काढायचा का हा देखील सर्वस्वी निर्णय त्यांचा असल्याचा खोचक टोला देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मारला. शरद पवार यांची विचारधारा कोणत्या भूमिकेवर आधारित आहे ते आपल्याला माहीत नसल्याचा देखील विखे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com