Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan on Narendra Modi : राम मंदिरावरून पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना डिवचलं; म्हणाले, दगडात देव असतो का..?

Ram Mandir ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं तीच लोकं आज नाचत आहेत. त्यामुळे राम मंदिराचा फार काही परिणाम वाटत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

Prithviraj Chavan News : या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्द्याचा फार काही परिणाम पडणार नाही. कारण गावागावांत खासगी मंदिर बांधणं आणि राम मंदिर बांधणं यात फरक काय. मोदींना राम मंदिराचा राजकीय फायदा करून घ्यायचा होता. पण, अयोध्येच्या बाहेर त्याचा प्रभाव नाही. तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल का करता, असा प्रश्न करून दगडातच देव असतो का, मला वाटलं तर मी कराडच्या मंदिरात जाईन. तुम्ही मुद्द्यावर निवडणूक लढा, असा सल्ला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोदींचे सरकार घालवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. बंडखोरी होत असेल तर शांततेने मार्ग काढला पाहिजे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याची चर्चा झाली आहे. जागावाटपावरून आकडेवारी बदलू शकते. त्यामुळे जागांची आदलाबदल होऊ शकते.

जागांची आदलाबदल करायला काहीही हरकत नाही. कोणाकडे सक्षम पर्याय असेल तर विचार होऊ शकेल. उमेदवारांची जात, त्याचा जन्म ठिकाण, पैसा या सर्वांचा विचार होत असतोच. अशोक चव्हाण यांना उपमुख्यमंत्री आणि चांगलं खातं घ्यायचं होतं. मात्र, त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढल गेलं आहे.

राष्ट्रीय पक्षांना निर्णय घेण्यास थोडा वेळ लागतो. मुंबईत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. दक्षिण मध्य मुंबई आणि पूनम महाजन यांची जागा मागितली होती. यावर अजूनही चर्चा करून निर्णय होऊ शकतो. कोल्हापूर शाहू महाराज यांच्यासाठी सर्वांचा आग्रह होता. त्यामुळे सांगलीच्या जागेवर राग काढून ती आम्हालाच द्या, असे म्हणणं योग्य नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगली काँग्रेसच्या विचारांचा मतदार आहे. त्यामुळे परस्पर यांच्या मान्यतेने निर्णय होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं तीच लोकं नाचत आहेत. त्यामुळे राम मंदिराचा फार काही परिणाम वाटत नाही. गावात खासगी मंदिर बांधलं आणि राम मंदिर बांधलं यात काय फरक आहे? मोदींना राम मंदिराचा राजकीय भाग घ्यायचा होता. अयोध्येच्या बाहेर त्याचा प्रभाव नाही. इमोशनल ब्लॅकमेल करता का तुम्ही? दगडातच देव असतो का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT