Buldhana Bus Accident Updates Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Buldhana Accident: समृद्धी महामार्ग शापित, पण याच्या खोलात जावं लागेल...; संजय राऊतांचे मोठं विधान

शनिवारी (1 जुलै) मध्यरात्रीच्या सुमाराम बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut on Buldhana Accident: समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या महामार्गासाठी राज्य सरकारने जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या. त्या शेतकऱ्यांच्या शापामुळेच या महामार्गावर अपघात होत आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

शनिवारी (1 जुलै) मध्यरात्रीच्या सुमाराम बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशाचा मृत्यू  झाला. या घटनेवरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आज काही महिन्यात समृद्धी महामार्गावरील अपघात वाढले आहेत. आजचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. अशी भावनाही राऊतांनी (Sanjay Raut) व्यक्त केली.

ज्या पद्धतीने हा महामार्ग बनवण्यासाठी जी मनमानी केली. आज दुर्दैवाने या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. हे काही चांगलं नाही. या रस्त्यावर वेगमर्यादेसंदर्भात नियम असावेत अशी आमची मागणी आहे. पण त्यावर काही होत नाही. हा मार्गच भ्रष्टाचारातून निर्माण झाला आहे. हे मार्ग तयार करण्यासाठी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्यात आल्या. याच शेतकऱ्यांचे शाप आणि अश्रू त्या जमिनीत आहेत. लोकांच्या शापांमुळे आज समृद्धी महामार्गावर अपघात होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Buldhana Accident)

याचवेळी त्यानी आदित्य ठाकरे यांच्या मोर्च्यावरही भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज बीएमसीवर मोठा मोर्चा निघेल. आदित्य ठाकरे यांनी रस्ते घोटाळा आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला आहे. ज्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे होत्या ते सगळे नग भाजप आणि शिंदे गटात गेलेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या मोर्च्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपनेही (BJP) आजच मोर्चा काढणार आहे. "चोर मचाये शोर" असं म्हणत ते ठाकरे गटाच्या मोर्चावर निशाणा साधला आहे. ही भाजपची एक नौटंकी आहे. विशेषत: मुंबई भाजपची नौटकीं आहे. त्यांना कोणतीही दिशा नाही. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. म्हणजे शोर कोण माजवतंय आणि चोर कोण हे कळेल, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT