Parner Politics : आमदार लंकेंचे टेन्शन माजी नगराध्यक्षांनी वाढवले, पारनेरच्या नगराध्यक्ष निवडणुकीत नवा ट्विस्ट !

Ahmednagar Politics : दहा नगरसेवकांना सहलीवर पाठवल्याची माहिती...
Vijay Aauti ; Nilesh Lankhe
Vijay Aauti ; Nilesh LankheSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगराध्यक्षपदासाठी (Parner Mayor) येत्या 5 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. 30 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी (Vijay Aauti) यांनी विरोधी गटात सामील होत उपस्थिती लावल्याने, त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच भाजपचे एकमेव नगरसेवक अशोक चेडे यांनीही आमदार लंकेंना पाठिंबा दिलेला असताना पुन्हा एकदा विरोधी गटात सामील दिसल्याने पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lankhe) यांच्यासमोर पक्षातीलच नगरसेवकाने आव्हान उभे केले असल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

मागील महिन्यात 23 जून रोजी पूर्वी ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष विजय औटी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांनी राजीनामे दिले होते. त्याही वेळी नगराध्यक्ष विजय औटी यांचे राजीनामा देताना राजकीय नाट्य दिसून आले होते. त्यामुळे अहमदनगरमध्ये विजय औटींसह राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांची गट नोंदणी करण्यात आली होती. एकूणच माजी नगराध्यक्ष विजय औटी हे आमदार लंके यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलं होते.

Vijay Aauti ; Nilesh Lankhe
Pradip Kurulkar Case Update : कुरूलकरच्या विरोधात ATS कडून २ हजार पानांचं दोषारोपपत्र; ७ जुलैला निकाल?

दरम्यान काल (30 जून) पारनेर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्याच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस कडून नितीन अडसूळ तर शिवसेनेतून विखे गटात आलेले युवराज पठारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. पठारे यांचा अर्ज दाखल करते वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, त्याचबरोबर भाजपचे नगरसेवक अशोक चेडे उपस्थित होते. त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी गटातील दोन नगरसेवक फुटल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीतच या परिस्थितीचा अंदाज आमदार निलेश लंके यांनाही आलेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अशी जवळपास दहा नगरसेवक सहलीवर पाठवल्याची माहिती मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक ही पाच जुलै रोजी होणार आहे. या निवडीनंतर उपनगराध्यक्ष पदाची ही निवडणूक होईल, असं सांगण्यात येतेय.

पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खासदार सुजय विखे गटानेही आता मोठा रस घेतलेला दिसून येत असून, राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही राष्ट्रवादीची काही मते फोडण्याबरोबरच विरोधी पक्षातील नगरसेवकांची जुळवाजुळव करत लंकेच्या ताब्यातील नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू केला असल्याचं दिसून येत आहे. एकूणच या राजकीय घडामोडींमुळे पारनेरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे नागरिकांचे मोठं लक्ष आता लागलेले आहे.

Vijay Aauti ; Nilesh Lankhe
PMC Bribe News : पुणे पालिकेतील कर्मचाऱ्यास तब्बल एक लाखाची लाच घेताना अटक; ACB ची धडक कारवाई !

पारनेर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 19 पैकी 11 नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची शिवसेनेच्या साथीने एक हाती सत्ता आमदार लंके गटाकडे होती. पूर्वी ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात देण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन नवीन नगरसेवकांना संधी देण्याचेही ठरलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक शिवसेना पक्षाच्या काही नगरसेवकांचाही पाठिंबा आहे. मात्र आता खासदार सुजय विखे यांनी शिवसेनेतील काही नगरसेवक आणि इतर असं अशी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असून येणाऱ्या पाच जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोणाची सरशी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com