Eknath Shinde, Rahul Kanal News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : शिंदे गटात प्रवेश होताच सुशांत सिंह अन् दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राहुल कनाल म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray, Eknath Shinde News : एकीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी राहुल कनाल यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. कोरोना काळात राहुल कनाल (Rahul Kanal) चांगला होता. मात्र, आता तो वाईट का झाला असा सवाल त्यांनी विचारला आहे. ज्यांनी पक्षासाठी काही केले नाही त्यांना पक्षात स्थान दिले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना कनाल म्हणाले, मी आणि तुम्ही कोरोकाळात रसत्यावर होतो. मी आपल्यापासून अनेक गोष्टी शिकल्या आहेत.

आपण आमचे नेते आहात. तुम्ही राजकारण सोडून बुलडाण्याला गेले. मला पक्षाने भरपूर दिले. मात्र, मीही पक्षाला खुप दिले. आम्ही ही पक्षाची सेवा केली. कोरोनाकाळातील मेव्याबाबत माझा काही संबंध नाही, असेही राहुल कनाल यांनी सांगितले. तसेच कनाल म्हणाले, लोक म्हणतात सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणामुळे तिथे गेला असले. मात्र, तुम्ही चौकशी करा आणि माझा थोडाजरी संबंध आढळला, तर माझे डोके आणि तुमचा बुट असले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, राहुलने युवासेनेचे काम केले आहे. आपल सरकार स्थापन होऊन एख वर्ष झाले. आम्ही एक वर्षभरात अनेक कार्यक्रम केले. हे सर्व निर्णय सर्व सामान्य माणसाच्या हिताचे घेतले. आपले सरकार स्थापन होण्यापूर्वी जे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामध्ये अनेक अनुभव आहे. राहुल कनालला अनेक अनुभव आले असतील कारण तो अगदी जवळ होता.

महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रकल्प थांबवले होते. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. शेतकऱ्यासाठी अनेक निर्णय घेतले. सर्व नियम बाजूला ठेऊन निर्णय घेतले. मात्र, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला, आरोग्य योजनेमध्ये मोठा बदल केला. जी योजना सव्वालाखाची होती. ती योजना पाच लाखापर्यंत नेली आहे, असेही मुख्यमंत्री सांगितले. येथे कामला संधी आहे, मला काम करणारे लोक आवडतात, असे ते राहुल कानालला म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या मोर्चासंदर्भात मुख्ममंत्री म्हणाले, आज आमचाही भाजपा आणि शिवसेना युतीचा मोर्चा होता, मात्र, बुलडाण्याला झालेल्या अपघातामुळे आम्ही तो थांबवला. आम्ही संवेदनशील लोक आहोत. मात्र, त्यांना राजकारण करायचे आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर येत आहे. त्यामुळे मोर्चा काढत आहेत. ईडी आमची थोडीच आहे. ती केंद्र सरकारची आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT